रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे ही संकल्पना खूप सुंदरअसली तरीही बदलत्या काळात विसरत चाललेली आहे, काही पिढ्यांपासून हरवलेली आहे. मात्र ती आता काळाची गरज बनली आहे. निसर्ग त्याच्या पद्धतीप्रमाणे म्हणतो आहे, ”अरे इकडे पहा , तुला पाहिजे ते सर्व माझ्याकडे आहे”.

आता संपूर्ण पुनरुज्जीवनाची वेळ आली आहे!

पूर्वीच्या काळातील आपली जीवनशैली खूप वेगळी होती – निरोगी आणि निसर्गाशी जुळलेली; आपण ब्राह्म मुहूर्तावर उठत होतो. आपले जीवन लयबद्ध होते. सकाळी साडेपाच वाजता किंवा त्यापूर्वीच उठून आपण चांगली फलदायी कामे करत होतो.

आणि हे लक्षात घ्या की आपली सकाळची कामे निसर्गाच्या सानिध्यातच पूर्ण होत असत मग ते नदीकाठी फिरणे असो की शेतातील हिरवळ किंवा हिरव्यागार बगीचांमधून फिरणे असो. सकाळच्या सूर्यकिरणांनी आपली ऊर्जा आणि शरीरातील विटामिन ड ची पातळी नैसर्गिकरित्या वाढण्यास मदत होत होती. आपल्या सभोवताली अनेक जीवन रक्षक औषधी वनस्पती होत्या आणि आपल्याला दिवसभर उत्साही ठेवत होत्या. तथापि वर्षानुवर्षे आपल्या जीवनशैलीतील बदलांमुळे आपण त्या सर्वांपासून दूर गेलो आहोत आणि कॉंक्रीटच्या जंगलाचा एक भाग बनलो आहोत. आपण वाहनांच्या गर्दीतून वावरत आहोत, भ्रमणध्वनीच्या गजबजाटात पारंपरिक वनौषधींची जागा व्यावसायिक शीतपेये आणि आधुनिक तांत्रिक घडामोडींनी घेतली आहे.
यातच आजच्या महामारीच्या काळात आपण एक पाऊल पुढे जाऊन घराच्या मर्यादेतच बांधले गेलो आहोत. प्रतिबंधित क्षेत्रे, अनेक नवनवीन संयंत्रे, दूरस्थ कार्यालयीन काम, शालेय शिक्षण, श्वासोच्छ्वासासाठी मर्यादित जागा आणि आणखी बरेच काही. संपूर्ण मानव जात विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक तणावात आहे. तरीही या अनिश्चित काळातही अनेक संधीही उपलब्ध होत आहेत. नैसर्गिक उपचाराद्वारे आपले आरोग्य सुधारण्यासाठी हीच वेळ आहे. निसर्ग त्याच्या पद्धतीप्रमाणे व लयी प्रमाणे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी काम करीत आहे. आणि येथे व आता आपल्याकडे आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीला पुनर्जीवित करण्यासाठी वनौषधी आहेत व आमच्या घरात, बाल्कनीत, बागेत, गच्चीवर त्या लागवड करण्याच्या पद्धतीही आहेत

साध्या फुले आणि वनौषधी द्वारे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवा

या वनौषधी केवळ औषधी मिश्रणात वापरल्या जात नाहीत तर २० पेक्षा जास्त प्रकारच्या वनौषधीयुक्त चहाचा भाग बनू शकतात ज्या आपल्या संपूर्ण शरीर प्रणालीला पुनरुज्जीवित करतात.

  • ब्रह्मकमळ
  • शंखपुष्पी
  • अमृतवेल
  • आले
  • पिंपळी

ब्रह्मकमळ

ब्रह्मदेवाच्या नावाने असलेली ही अत्यंत दुर्मिळ,पवित्र व सुंदर फुले आपली घरे सुशोभित करण्यासाठी उपयुक्त आहेत.ही औषधी असून त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळत असतो.

पावसाळ्याच्या मध्यात उमलणारी ही फुले पॅरासिटामोल सारख्या औषधाऐवजी सामान्य सर्दी आणि ताप यावर उत्तम गुणकारी असून आतड्यांसंबंधी व मूत्र रोगांच्या विकारावर देखील प्रभावी आहेत. याच्या पाकळ्या टाकून बनवलेला चहा अनेक संसर्गांपासून मुक्त ठेवून तुमची प्रतिकारशक्ती वाढवेल.

शंखपुष्पी

शंखपुष्पी किंवा अपराजिता हा एक पारंपरिक वनौषधी उपचार आहे जो आपल्याला आरोग्याचे भरपूर लाभ देतो. हे एक उत्तम अँटिऑक्सिडेंट आहे, जे आपल्या शरीरातील विषद्रव्ये काढून टाकण्यास मदत करते.

पारंपारिक पद्धतीनुसार ही औषधी आयुर्मान वाढवणारी असून ती शक्ती, स्मरणशक्ती, एकाग्रता आणि बुद्धीची प्रवर्तक मानली जाते.

खालील उपचारात तिचे महत्व अधिक आहे.

  • मानसिक थकवा
  • निद्रानाश
  • चिंता
  • रक्तदाब आणि नैराश्य
  • संधिवात आणि संधिवातातील वेदना

या औषधी वनस्पतीचा अर्क कोमट दुधासह सेवन केला जाऊ शकतो.

अमृतवेल 

अमृतवेल किंवा गुळवेल ही एक आश्चर्यकारक प्राचीन औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे नावच अमृत असून ते अमरत्व सुचित करते. गोळ्यांच्या स्वरूपात बाजारात उपलब्ध असलेले हे औषध आपल्या घरातील बागांमध्ये लावता येते.

तिच्या अँटीऑक्सिडेंट, प्रति जैविक, दाहक विरोधी, ताप उतरवणारे, एलर्जी विरोधी गुणधर्मामुळे ही वनस्पती रक्त शुद्ध करते व शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढते, रोगांना कारणीभूत असणाऱ्या जिवाणुंशी लढा देते, यकृत रोग आणि मूत्रमार्गाच्या सामना करण्यास मदत करते. ती कर्करोग विरोधी असून पेशींचे पुनरुज्जीवन करण्यास देखील मदत करते.

याशिवाय ती तणावावर मात करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि दैनंदिन जीवनात आपल्याला उत्साही ठेवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

आले किंवा अद्रक (अदरक)

अद्रक ही आमची स्थानिक वनस्पती असून आपल्या स्वयंपाक घरात नियमित वापरली जात असून अनेक औषधी गुणधर्मांनी ती परिपूर्ण आहे. अद्रकचे कंद आपल्या परसबागेत सहज लावता येतात, ती सुरक्षात्मक असून त्यात भरपूर उपचारशक्ती असते. ती आपले आतडे बरे करते, पचनसंस्थेचे नियमन करते व श्वसनाचे विकार बरे करण्यासाठी देखील प्रभावी आहे. आल्याचा रस दररोज सकाळी लिंबू आणि मधाबरोबर घेतल्यास सर्दी आणि ऋतू बदलामुळे होणारे आजार दूर करते. ती तुम्हाला दिवसभर हलके ताजे आणि सक्रिय ठेवते.

पिंपळी

पिंपळी किंवा लेंडी पिंपळी ही एक अद्वितीय सुगंधी औषधी आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये ती वापरली जाते. ती अपचन, दमा, खोकला आणि श्वसनाचे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. तिच्यामुळे भूक देखील सुधारते.

ती त्रिदोषिक औषधी वनस्पती म्हणून ओळखली जाते. ती सर्व प्रकारच्या शरीर प्रकृतीसाठी उपयुक्त आहे. यापासून बनवलेले औषध श्वसन आणि पचन विकारांपासून त्वरित आराम देते व रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते.

कृती:

  • पिंपळीची पाच पाने
  • अर्धा इंच आले
  • अर्धा इंच हळद

हे २०० मिली पाण्यात उकळवा व त्यात चवीनुसार गूळ घाला.

विकल्प म्हणून तुळस, अमृतवेल आणि पिंपळी यात लिंबाचे काही थेंब टाकून चहा केल्यास अतिशय चवदार होतो व आपण ताजेतवाने होतो.

गुरुदेव म्हणतात, 

“आपल्या जीवनासाठी आवश्यक सर्व गोष्टींना आपली परंपरा पवित्र मानते. उदाहरणार्थ तुळशी आणि कडुलिंब ज्यात ताप विरोधी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे गुणधर्म आहेत. ते प्राचीन काळापासून अतिशय पवित्र मानले गेले आहेत. लिंबू हे शक्तीचे प्रतीक आहे. म्हणून देवीच्या मंदिरांमध्ये त्रिशुळाच्या शिखरावर त्याला स्थान मिळते. तुळस भगवान विष्णूच्या उपस्थितीचे प्रतीक आहे. बेलाची पाने मज्जासंस्थेचे कार्य सुधारतात. ते भगवान शिवाचे प्रतीक आहेत.

हे सर्व निसर्गाच्या प्रत्येक पैलू मध्ये फुले, फळे, पाने आणि झाडांमध्ये देवत्वाच्या उपस्थितीचे प्रतीक आहे.”   

या सर्वही वनस्पती आपल्या परसबागेतील इतर वनस्पती व भाज्यांवरोबर लावता येऊ शकतात. तसेच नैसर्गिक रित्या आपल्या आहारास पूरक ठरतात. परिसंस्थेतील सहयोगाने त्या समृद्ध असतात व आपल्या सभोवताली एक निरोगी वातावरण तयार करून आपली प्रतिकार शक्ती मजबूत करतात. 

जेव्हा परिसंस्थेत योग्य लय निर्माण होते तेव्हा आपल्या श्वासोच्छवासाच्या प्रणालीमध्ये नैसर्गिक संतुलन येते व आपण निरोगी रहातो.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *