भारताबद्दलची आश्चर्यकारक तथ्ये.

“माझ्या मनात उद्भवत असतात विलक्षण दृष्टान्त:
अनंत काळाच्या वाईटाची, आणि या धरतीपेक्षाही जुनी लढाई,
जी लढली गेली आहे याआधी अगणित जगात, विस्मृतीत गेलेल्या युगात.
लंकेच्या या युद्धानंतरही पुन्हा पुन्हा युद्ध होणार आहेतच;
काळाचा अंत होईपर्यंत, आणि त्यासोबत धर्म आणि अधर्माचाही.”

लंकेच्या किनार्‍यावर आल्यावर श्रीराम हे शब्द लक्ष्मणाशी जणू समाधि अवस्थेत बोलतात. श्रीराम त्यांच्या महान नशिबाला सूचित करत आहेत: युगानुयुगातील वाईटाचे निर्मूलन करण्यासाठी. हा उतारा हिंदू विश्वउत्पत्ती शास्त्रातील, काळाच्या गहन आणि चक्राकार स्वरूपाला अधोरेखित देखील करतो; दीर्घ काळाच्या परीक्षेपात घटनांची पुनरावृत्ती होत असते.

रामायण हे खरंच एक प्राचीन महाकाव्य आहे जे आजही जिवंत आहे. यातल्या संहितेला अनेक कंगोरे आहेत, चरित्रे उत्तम प्रकारे कोरलेली आहेत आणि वाईटावर चांगल्याचा श्वास रोखून धरणारा विजय आहे. अनेक तथ्ये एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. कदाचित आपल्या आधुनिक जीवनात अशा काळाचा विचार करणे देखील कठीण आहे. तरीही, हे घडलेले आहे आणि सर्व महान कथांप्रमाणे, यात पुन्हा पुन्हा जगण्यासाठी बरेच काही आहे.

यातले प्रश्न आपल्याला चकित करत असले तरी, उत्तरे आपल्याला आणखी चकित करतील.

१. रामाचा जन्म राम नवमीला झाला होता का?

रामाच्या जन्माची तारीख आणि वेळ दुपारी १२.३० वाजता दिनांक १० जानेवारी, ईसवीपूर्व ५११४, निर्धारित केली गेली आहे. प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअर वापरून रामाच्या जन्माची तारीख अचूकपणे काढता येणे शक्य आहे.

जर रामाचा जन्म त्या तारखेला झाला असेल तर आपण रामनवमी मार्चच्या शेवटी-एप्रिलच्या मध्यावर का साजरी करतो? याचे कारण विषुववृत्ताच्या अचूकतेची संकल्पना आहे, ज्यात दर ७२ वर्षांनी एक दिवस समायोजित केला जातो. अशा प्रकारे ७२०० वर्षांच्या कालावधीत, ते १०० दिवस, १० जानेवारी पासून सुमारे १५ एप्रिल च्या दरम्यान येतात.

२. रामाने ११,००० वर्षे राज्य केले का?

काही म्हणतात की रामाने ११,००० वर्षे राज्य केले.

श्रीराम २५ वर्षांचे असताना वनवासात गेले. ते अयोध्येला परतले आणि वयाच्या ३९ व्या वर्षी राज्याभिषेक झाला. त्यांच्या राज्याभिषेकानंतर ३० वर्षे आणि ६ महिने राज्य केल्यानंतर, जेव्हा ते सुमारे ७० वर्षांचे होते, तेव्हा श्रीरामाने राज्याचा त्याग केला.

दश वर्ष सहस्रानी दश वर्ष शतानी च|
रामो राज्यं उपासित्वा ब्रह्म लोकं प्रयास्यती ||

रामायण – १-१-९७ १

याचा अर्थ असा आहे: “दहा हजार वर्षे आणि आणखी एक हजार वर्षे, (म्हणजे एकूण ११,००० वर्षे) आपल्या राज्याच्या सेवेत राहिल्यानंतर, श्रीरामाने ब्रह्मदेवाच्या स्थानाकडे प्रवास केला … “

परंतु रामाचे अस्तित्व फक्त ७,१०० वर्षांपूर्वी, ईसवीपूर्व ५१०० मध्ये होते असे म्हटले जाते. आपण या दोन्हीमध्ये संबंध कसा साधायचा?

याचे उत्तर दुसऱ्या महाकाव्यातून, महाभारतातून मिळते.
“अहोरात्रं महाराज तुल्यं संवत्सरेम् ही”
महाभारत, श्लोक ३-४९-२१

तात्पर्य, महाराजांसाठी, धर्माप्रमाणे जीवन जगणाऱ्या व्यक्तीसाठी, एक दिवस एक वर्षाच्या बरोबरीचा असतो. १ वर्ष ३६० दिवसांचे आणि ३० दिवसांचे १२ महिने धरल्यास, काव्यात्मक रुपातली ११,००० वर्षे, रामाने अयोध्येवर राज्य केलेल्या वास्तविक वर्षांची संख्या म्हणून आपल्याला ३० वर्षे आणि ६ महिने मिळतात.

३. पुष्पक विमान खरे होते का?

श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर ज्यात बसून ते लंकेतून अयोध्येला परतले, ते पुष्पक विमान रावणाच्या अनेक विमानांपैकी एक होते.

विमान या शब्दात वि म्हणजे ‘आकाश’ आणि मान, म्हणजे ‘माप’. आकाशातून जाताना जे मोजते ते म्हणजे विमान.

रामाबद्दल तथ्ये

पुराणात तसेच रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमध्ये विमानाबद्दल अनेक कथा आहेत. महर्षी भारद्वाज यांच्या वैमानिक शास्त्रासारखे स्वतंत्र, तांत्रिक साहित्य उपलब्ध आहे, जे तांत्रिक दृष्टीकोनातून विमानाबद्दल चर्चा करते. पुष्पक विमानाच्या आकारात आकुंचन (संकोच) किंवा विस्तार (विस्त्रित) करण्याची विशेष क्षमता यात स्पष्ट केली आहे.

महर्षि भारद्वाज यांनी सुमारे १२० विविध विमानांचा उल्लेख केला आहे, जे वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशांमध्ये अस्तित्वात होते. या विमानांच्या उड्डाणासाठी वापरण्यात आलेले इंधन, विमानसंचारशास्त्र विमानशास्त्र (एरोनॉटिक्स, एव्हिओनिक्स), धातूविज्ञान आणि इतर युक्त्या यांचीही ते झलक दाखवतात.

४. रावणाकडे अनेक विमाने होती का?

होय!
रावणावर विजय मिळवल्यानंतर पुष्पक विमानात बसून लंकेवरून उडत असताना राम लक्ष्मणाला सांगतो.

पृथ्वीवर लंका चमकते
अनेक विमानांनी जडलेली
जणू विष्णूची राजधानी आहे
पांढऱ्या ढगांनी झाकलेली

रावणाच्या लंकेच्या राज्यात सहा विमानतळ होते.

  • महियांगना मधील वेरागंटोटा: सिंहली भाषेत या शब्दाचा अर्थ विमान उतरण्यासाठी जागा असा होतो.
  • हॉटन पठारावरील तोटूपोला कांडा: तोटूपोला या शब्दाचा अर्थ बंदर, प्रवासादरम्यान स्पर्श करणारी जागा. कांडा म्हणजे खडक. तोटूपोला कांडा ही समुद्रसपाटीपासून ६,००० फूट उंचीवर खडकाळ पर्वतरांगांवरची सपाट जमीन आहे.
  • दक्षिण किनार्‍यावरील उसंगोडा
  • कुरुणेगला मधील वारियापोला
  • मटालेतील वारियापोला – वारियापोला हा शब्द वाथा-री-या-पोला या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ विमानाच्या उतरण्याची व उड्डाण घेण्याची (लँडिंग आणि टेकऑफसाठी) जागा आहे.
  • महियांगना मधील गुरुलुपोथा – सिंहलीमध्ये गुरुलुपोथा म्हणजे पक्ष्यांचे भाग, हे विमानाचे हॅन्गर किंवा दुरुस्ती केंद्र असल्याचे दर्शविते.

रावणाने वापरलेले आणखी एक सुप्रसिद्ध विमान म्हणजे दांडू मोनारा. स्थानिक सिंहली भाषेत, मोनारा म्हणजे मयुर, मोर आणि दांडू मोनारा म्हणजे “मोरासारखे उडू शकणारे”.

ही तथ्ये आकर्षक वाटली ना? मन आणि शरीरही तितकेच आकर्षक आहे. आर्ट ऑफ लिव्हिंग मेडिटेशन अँड ब्रेथ वर्कशॉपमध्ये स्वतःला शोधा आणि मनाच्या व्यवस्थापनाची रहस्ये शोधा.

मन आणि श्वासाचे आकर्षक पैलू शोधा.

५. राम सेतू खरोखरच बांधला गेला होता का?

राम आणि त्याची वानर सेना समुद्रपार करून लंकेत पोहोचली नसती तर रामायणाची लढाई कधीच झाली नसती. जमिनीच्या संपर्काशिवाय पोहोचणे अशक्य होते. आणि आख्यायिका सांगते की वानरांच्या सैन्याने प्रत्येकाला ओलांडता येईल यासाठी पूल बांधला.

हजारो वर्षांनंतर, नासाने घेतलेल्या अंतराळ प्रतिमांमधून भारत आणि श्रीलंका यांच्या मधील पाल्क सामुद्रधुनीत एक रहस्यमय प्राचीन पूल दिसून येतो.

रामायण सांगते की वानरांनी एक बांध किंवा मार्ग तयार करण्यासाठी, झाडांचा ढीग, नंतर मोठमोठे दगड आणि शेवटी लहान दगड यांची वाहतूक आणि ढीग करण्यासाठी यंत्र किंवा यांत्रिक वाहने वापरली. वास्तुविशारद नील आणि नल यांच्या देखरेखीखाली एक कोटी वानरांच्या साह्याने हा पूल बांधण्यासाठी पाच दिवस लागले. जेव्हा तो बांधला गेला तेव्हा पुलाची परिमाणे १०० योजने (योजन हे अंतराचे वैदिक मोजमाप आहे) लांबीची आणि १० योजने रुंदीची होती, ज्यामुळे त्याचे गुणोत्तर १०:१ होते.

एक छोटी कथा

वानर दगडावर श्रीराम लिहून पाण्यात टाकत होते. सगळे दगड तरंगत होते.अशी श्रद्धा आहे की, जेव्हा परमेश्वराचे नाव तुमच्याबरोबर असते तेव्हा तुम्ही बुडणार नाही.

जेव्हा रामाने हे पाहिले तेव्हा त्याला इतके आश्चर्य वाटले की त्याला स्वतःसाठी प्रयत्न करून बघायचा होता. ज्या दगडावर त्याने लिहिले तो दगड बुडाला. रामाला आश्चर्य वाटले.

हे सर्व दृश्य पाहून एक वानर हसायला लागला आणि रामाला म्हणाला, ‘ज्यांना तू हातातून फेकून देतोस, ते कसे तरतील? ते तर बुडतीलच!’

भक्त हे स्वतः परमेश्वरापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्यवान असतात!

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

भारतातील धनुष्कोडी ते श्रीलंकेतील तलाईमन्नार पर्यंतचा पूल, सध्याच्या काळात मोजल्याप्रमाणे १०:१ च्या प्रमाणात अंदाजे ३५ किमी लांब आणि ३.५ किमी रुंद आहे. आजही रामेश्वरमच्या किनारपट्टीवर काही तरंगणारे दगड सापडतात. विज्ञान या घटनेचे स्पष्टीकरण देऊ शकले नाही.

समुद्रशास्त्राच्या अभ्यासानुसार राम सेतू ७००० वर्षे जुना आहे. आणि धनुषकोडी जवळील समुद्रकिनाऱ्यांची कार्बन डेटिंग रामायणाच्या तारखेशी मिळतीजुळती आहे.

६. वनवासाला जाण्यापूर्वी कौशल्याने रामाला काय सांगितले?

वनवासात जाण्यापूर्वी, राम आपली आई कौशल्या हिला भेटायला जातो आणि १४ वर्षांच्या वनवासाला जाण्यासाठी तिची परवानगी मागतो. त्यांच्यात संवाद होतो. हे ईसवीपूर्व ५ जानेवारी ५०८९ रोजी घडले.

कौशल्या म्हणाली, “तुझ्या वडिलांनी तुला निर्वासित केले असेल, तर मी त्यांना हे टाळायला लावू शकते.”

पूर्वीच्या काळात, राण्यांना राजाची आज्ञा मोडण्याचा अधिकार होता. राजासह सिंहासनावर बसलेल्या राणी किंवा महाराणीसाठी हे लागू व्हायचे.

कौशल्याने पुढे म्हटले आहे: “परंतु जर कैकेयीने आज्ञा केली असेल, तर तुम्ही जावे. नक्कीच, तिच्या मनात तुमचे सर्वोत्तम हित असेल.”

७. रामायण लिहिताना वाल्मिकींनी रामाची भेट घेतली होती का?

रामायणाचे लेखक वाल्मिकी यांनी रामाच्या हयातीतच रामायण इतिहासाची रचना केली. रामाचे जुळे पुत्र, लव आणि कुश, रामाला कथा सांगतात आणि अशा प्रकारे या घटना प्रमाणीत होतात. रामायण आख्यायिका इतिहास आहे, याचा अर्थ असे घडलेले आहे.

एका सत्पुरुषाला भेटण्याच्या शोधात, वाल्मिकी नारदांना भेटले आणि त्यांना विचारले: “आजपर्यंत झालेला सर्वात महान पुरुष कोण आहे?”

त्यानंतर नारदांनी रामाची कथा काही ओळींमध्ये सांगितली. वाल्मिकी रामाशी संवाद साधलेल्या लोकांकडून त्यांच्याबद्दल माहिती संकलित करतात. वाल्मिकी रामायणाची कथा असलेली काव्य गाथा लिहू लागतात. वाल्मिकी नंतर सीतेला आश्रय देतात आणि त्यांच्या आश्रमात लव आणि कुशाला शिकवतात.

फक्त वाल्मिकींच्या रामायणाला इतिहास म्हणतात तर इतर रामायण ग्रंथ जसे की गोस्वामी तुलसीदासांचे रामचरित्रमानस, कालिदासचे रघुवंश, कंबर यांचे रामायणम यांना काव्य (उत्कृष्ट काव्यरचना) असे म्हटले जाते.

८. रावणाच्या वधासाठी रामाला प्रायश्चित करावे लागले का?

रावणाला त्याच्या विद्वत गुणांमुळे ब्राह्मण, विद्वान असे देखील मानले जात असे. म्हणून रामाला ब्राह्मण वधम् प्रायश्चितम्, म्हणजेच ब्राह्मणाच्या हत्येचे प्रायश्चित करावे लागले. म्हणून त्याच्या राज्याभिषेकानंतर, त्याने आपल्या भावासोबत देवप्रयागला भेट दिली, आणि रावण या विद्वानाचा वध केला म्हणून प्रायश्चित्त घेतले. देवप्रयाग भारताच्या उत्तरेकडील उत्तरांचलमध्ये आहे.

आजही स्थानिक परंपरेनुसार देवप्रयाग हे दिवंगत आत्मे आणि पूर्वजांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तीर्थक्षेत्र आहे.

९.कापाडपुरम अस्तित्वात होते का? 

जेव्हा सुग्रीवाने वानरांचा दुसरा गट दक्षिणेकडे पाठवला आणि त्यांना पुढील ठिकाणी सीतेचा शोध घेण्याची सूचना केली:

“मलयागीर पर्वत शोधा, तिथे तुम्हाला अगस्त्य ऋषी सापडतील, मग कावेरी नदी पार करा, मग तामरापराणी नदी पार करा, मग तुम्हाला पांड्या राजांची राजधानी कापाडपुरमचा सुवर्ण दरवाजा दिसेल,”

– वाल्मिकी रामायणम – किष्किंदा खंडम अध्याय ४१ – श्लोक १४-१८

कापाडपुरम हे दुसऱ्या तमिळ संगम काळातील एक प्रसिद्ध शहर आहे. तमिळ संगम ग्रंथानुसार हे शहर आता समुद्रात बुडाले आहे.

१०. मंदोदरी कोण होती?

मंदोदरी ही रावणाची पत्नी होती. ती महान वास्तुविशारद, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कुशल अभियंता म्हणून प्रसिद्ध असलेल्या मयासुराची कन्या होती. मंदोदरी ही भारतातील प्रसिद्ध पंचकन्यांपैकी एक मानली जाते.

भारतीय परंपरेत पाच महिलांना त्यांच्या आदर्श जीवनासाठी पंचकन्या ही पदवी देण्यात आली आहे. त्या अहिल्या, सीता, मंदोदरी, द्रौपदी आणि तारा आहेत.

“भारत ज्ञान’ च्या पुस्तकातील उताऱ्यावर वर आधारित. डॉ. डी. के. हरी आणि डॉ. हेमा हरी या मनस्वी पती-पत्नी जोडीच्या नेतृत्वाखालील संशोधन पथकाने भारतातील काही न सांगितल्या गेलेल्या कथा शोधून काढल्या आणि त्या काळाला सुसंगत बनवल्या. भारतीय संस्कृतीवरील त्यांची कोणतीही पुस्तके खरेदी करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *