किशोरवयीन मुलांचे संगोपन करणे हे भविष्याचे शिल्प बनवण्यासारखे आहे. आज, किशोरवयीन मुलांचे पालक या नात्याने, आपल्यावर भावी जग घडवण्याची संधी आणि जबाबदारी आहे. आपल्या किशोरवयीन मुलांमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना यशस्वी होण्यास मदत करण्यासाठी, पुढील माहिती शेवटपर्यंत तपशीलवार वाचा.
- मुलांना सतत शिकत रहाण्यासाठी प्रोत्साहन द्या.
- पुस्तके वाचणे
- व्हिडिओ पाहणे
- लोकांचे निरीक्षण करणे
- कार्यशाळांमध्ये भाग घेणे
- आपल्या किशोरवयीन मुलांना हे ठासून सांगा की, “तुम्हाला जे आवडते त्याचा पाठपुरावा करा आणि तुम्ही जे करता त्यात रुची निर्माण करा.”
- ज्ञान कुठूनही मिळू शकते.
- तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या वेळेचे आणि तुमच्या पैशाचे महत्व ओळखण्यास शिकवा.
- योग्य प्रकारे श्वास घेतल्याने आपणास यशाचा मार्ग सापडत जातो.
- तुमच्या किशोरवयीन मुलांनाच नव्हे तर त्यांच्या मित्रांनाही खायला द्या.
- केव्हाही जेवण (ATM Any time meal)
- तुमच्या किशोरवयीन मुलांच्या मित्रांच्या परिवाराशी जोडलेले रहा.
- विनम्रता यशस्वी किशोर होण्यास मदत करते.
- तुम्ही जे खाता तेच, तसेच तुम्ही बनता ‘जसे अन्न तसे मन’
स्वतःला विचारा…
- तुम्हाला नाती अशीच समजून घेता आली का?
- किशोरवयात तुम्हाला धोक्यांचा सामना करावा लागला नाही का?
- तुम्ही किशोरवयीन असताना तुमच्या वडिलांनी किंवा आईने तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायला हवे होते अशी तुमची इच्छा नव्हती का?
किशोरांना सतत शिकत रहाण्यासाठी प्रोत्साहन द्या.
किशोरांना स्वतःबद्दल जाणून घेण्यास, त्यांच्या आवडी ओळखण्यास आणि त्यांना करियर निवडण्यास मदत करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्या. पुस्तके वाचणे, व्हिडिओ पाहणे, लोक आणि परिस्थितीचे निरीक्षण करणे, कार्यशाळांमध्ये भाग घेणे इत्यादीद्वारे मुले शिकू शकतात.
आपल्या किशोरवयीन मुलांना ह्यासाठी प्रोत्साहित करा, “तुम्हाला जे आवडते त्याचा पाठपुरावा करा आणि तुम्ही जे करता त्यात रुची निर्माण करा.”
सुरुवातीला, तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या आवडीचे अनुसरण करण्यासाठी मार्गदर्शन करा आणि नंतर त्यांची आवड यशस्वी कारकीर्द म्हणून पुढे नेली जाऊ शकते कां याचे विश्लेषण करायला लावा. त्यांचे ज्ञान अद्यावत करत रहा. बुद्धी आणि मन विस्तृत ठेवा. ज्ञान कुठूनही मिळू शकते.
तुमच्या किशोरवयीन मुलांना त्यांच्या वेळेचे आणि तुमच्या पैशांचे महत्व जाणण्यास शिकवा
सोसायटीतील एक प्रदर्शन स्टॉल , शालेय जत्रेतील स्टॉल किंवा अर्धवेळ नोकरी हे किशोरवयीन मुलांसाठी पैशाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी चांगले मार्ग आहेत.
योग्य श्वास घेतल्याने यशाचा मार्ग सापडत जातो.
तणावाच्या वेळी आपण काय करतो? उसासा टाकतो, बरोबर? ह्या नैसर्गिक प्रतिसादात आपल्याला एक गोष्ट समजते की भावनांचा आपल्या श्वासाशी संबंध आहे. आता, श्वासोच्छवासाचे तंत्र शिकल्याने तुमचे नकारात्मक किंवा तणावग्रस्त मन सकारात्मक स्थितीत बदलू शकते. म्हणून, गुरुदेव श्री श्री रविशंकर, किशोरवयीन मुलांना दररोज काही मिनिटांचा श्वासोच्छवासाचा व्यायाम, प्राणायाम आणि ध्यानाचा सराव करण्याचा सल्ला देतात. यामुळे किशोरवयीन मुलांना नवीन आव्हाने स्वीकारण्याची उर्जा आणि उत्साह मिळेल आणि ते जीवनाच्या सर्व क्षेत्रात यशस्वी होऊ शकतील.
तुमच्या किशोरवयीन मुलांनाच नव्हे तर त्यांच्या मित्रांनाही खायला द्या
किशोरावयीन मुलांना खूप भूक असते आणि त्यांच्या मित्रांनाही. तुमच्या मुलाच्या मित्रांना तुमच्या घरी जेवणासाठी आमंत्रित करा. जेव्हा तुमचे स्वयंपाकघर एटीएम बनेल (Any Time Meal केव्हाही जेवण ), तेव्हा तुमचा मुलगा आणि त्याचे मित्र तुमच्या येथे वारंवार वेळ घालवतील. अशा प्रकारे, तुमचे त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण होतील.
तुम्ही त्याला थेट सांगितल्यास, तुमचे मूल काही गोष्टी सहजपणे स्वीकारणार किंवा करू शकणार नाही, ज्या त्याने कराव्यात असे तुम्हाला वाटते, त्याला त्याच्या मित्रांद्वारे नक्कीच असे करवून आणले जाऊ शकते. कारण तुमचे मूल त्याच्या मित्रांना नाकारण्याची शक्यता नाही आणि ते जे काही करतात त्याचे पालन करण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाच्या मित्रांना घरी जेवणासाठी आमंत्रित केल्याने तुम्हाला त्याच्या मित्रांवर सकारात्मक पद्धतीने प्रभाव टाकण्याची आणि त्यांच्याद्वारे तुमच्या स्वतःच्या मुलावर प्रभाव टाकण्याची संधी मिळेल.
तुमच्या किशोरवयीन मुलांच्या मित्रांच्या कुटुंबाशी संपर्कात रहा.
तुमच्या मुलाच्या मित्रांच्या परिवारासोबत एकत्र येण्याने सर्वांमध्ये आपुलकी निर्माण होऊन गरजेच्या वेळी एकमेकांना मदत करता देईल (विशेषतः पुढील कारकीर्द,व्यवसाय यासंबंधी सल्लामसलत)
विनम्रता यशस्वी किशोर होण्यास मदत करते
ज्या किशोरवयीन मुलांचे चवीचे चोचले असतात आणि जे जेवणाबाबत चोखंदळ असतात, त्यांना स्वयंपाकघरात मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. जेवण तयार करण्यात सक्रिय सहभाग घेतल्याने मुलांना अन्नाचे महत्त्व पटेल आणि ते एकूणच अन्नाची जाणीव ठेवण्यास शिकतील. शेतापासून ताटापर्यंत अन्न येण्यासाठी भाग घेणाऱ्या सर्वांच्या प्रयत्नांची ते कदर करतील. त्यांच्यामध्ये कृतज्ञता निर्माण करण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. कृतज्ञता व्यक्तीला नम्र बनवते.
तुम्ही जे खाता तेच, तसेच तुम्ही बनता ‘जसे अन्न तसे मन’
“बालपणी मुलांच्या पोषणामध्ये गुंतवणूक करणे हे एक खात्रीचे धोरण आहे. ह्याचे लाभ विश्वास बसणार नाही, एवढे भारी आहेत.” – अॅन एम. मुलकाही. ह्यावरून तुम्हाला समजेल की मुलाचे पोषण चांगले असेल तर, त्यांचे आरोग्य चांगले रहाते आणि किशोरवयीन जीवनात यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. संशोधन असे म्हणते की, पोषक आणि नैसर्गिक घरगुती अन्न सर्वोत्तम आहे.
स्वतःला विचारा…
तुम्हाला नाती अशीच सहज समजून घेता आली का? नाही ना ? मग तुमच्या किशोरवयीन मुलांनाही थोडा वेळ द्या.
दरवेळी रागावून आपल्या किशोरवयीन मुलांचा स्वाभिमान कमी करण्याऐवजी, त्यांना समजून घ्या आणि त्यांच्याशी प्रेमाने व्यक्त व्हा.
तुम्ही किशोरवयीन असताना तुमच्या वडिलांनी किंवा आईने तुमच्याशी वेगळ्या पद्धतीने वागायला हवे होते असे तुम्हाला वाटले नव्हते कां ? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला संयमित पालकत्व आणि कठोर शिस्त यांच्यातील अंतर कमी करण्यात मदत करेल.
गुरुदेव श्री श्री रविशंकर किशोरवयीन मुलांना सायकल चालविण्यासारखे जीवनात अभ्यास, कारकीर्द, नातेसंबंध आणि त्यांची स्वप्ने यांचा समतोल राखण्याचा सल्ला देतात.
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या प्रशिक्षक, ज्या मुले आणि किशोरांसाठी कार्यशाळा आयोजित करतात, त्या श्रेया चुग म्हणतात, “समवयस्कांचा दबाव आणि प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्याची गरज तरुणांना अत्यंत टोकाच्या भूमिका घेण्याकडे नेत आहे. लहान मुले आणि किशोरवयीन मुलांसाठी असलेल्या कार्यशाळेत त्यांना त्यांचे मन ताब्यात ठेवण्यासाठी आणि ते जे काही करतील ते उत्तमरीत्या पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण साधने मिळतात.
प्रशस्तिपत्र : गुडगाव, हरियाणातील १३ वर्षीय, उत्कर्ष योग सहभागी, अनन्या म्हणते: “आज आपल्याला इंटरनेट आणि दूरदर्शनमुळे खूप स्वातंत्र्य आहे. आपल्याला पाहिजे ते लिहिण्याचे अधिकार आहेत. जर आपले मनावर नियंत्रण असेल , तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आणि ते नियंत्रण केवळ ध्यानातूनच येऊ शकते.” ध्यानाचा किशोरवयीन मुलांचे बोलणे सुसंस्कृत करण्यावर खूप प्रभाव पडतो.
गुरुदेवांची परंपरा प्राचीन आहे. आणि चार दशकांहून अधिक काळ योग परंपरेचा ज्ञानप्रसार करत आहेत. संकल्पनांच्या पलीकडे जाऊन तुमच्या शरीरातील चक्रांचा अनुभव घेण्यासाठी गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शक चक्र ध्यानाचा आनंद घ्या.
किशोरवयीन , तरुण आणि त्यांच्या पालकांसाठी शिफारस केलेले लेख आणि व्हिडिओ
“आपल्या किशोरवयीन मुलांची आक्रमकता सहानुभूतीने कमी करण्यासाठी ६ सूचना” हा लेख नक्की वाचा. हा आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त ध्यान शिक्षक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या शिकवणीवर आधारित आहे.
गुरुदेव श्री श्री रविशंकर यांचे “परिवर्तन घडवून आणणारी तरुणांची शक्ती” (The power of youth as changemakers) . एक तरुण अभिनेत्री आणि प्रभावी अशी – अनुष्का सेन, नौजवान योग शिक्षक – टाबे ऍटकिन्स, गायक, शास्त्रीय पियानोवादक, संगीतकार आणि अभिनेता – डेवी कॅम्पोलोंगो, आणि अमेरिकेतील तरुण शास्त्रज्ञ ऋषभ जैन यांचा हा एक विलक्षण थेट कार्यक्रम आहे.
आर्ट ऑफ लिविंग च्या तज्ञ पाककला प्रशिक्षक कौशानी देसाई, यांचे “सर्जनशील पाककला”. साधे साहित्य, उत्कृष्ट चव आणि खास मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी पदार्थांचे आकर्षक सादरीकरण.