तुम्ही काय निवडाल? एक सामान्य आहार योजना , ज्यामध्ये सर्व आवश्यक पोषण समाविष्ट आहे. परंतु आपल्या प्रणालीशी असेल किंवा नसेल? किंवा आपल्या अभिरुचीशी सहमत असलेले निरोगी, नैसर्गिक आणि चवदार अन्न?
हा एक साधा प्रश्न वाटतो, बरोबर? साहजिकच, नैसर्गिकरित्या दुसरा पर्याय योग्य वाटतो त्यात सर्वोत्कृष्ट निवडीचे सर्व घटक आहेत! तरीपण आश्चर्य म्हणजे, रोजच्यारोज आपल्यापैकी बहुतेकजण पहिला पर्याय निवडतात.
अर्थात, तुम्ही हे करत आहात यावर तुमचा विश्वास बसत नाही. शेवटी, आपण आहारात पोळी, भाकरी, भात, डाळ, हिरव्या पालेभाज्या, फळे, मेवा, दूध, दही आणि पाणी समाविष्ट करतो. तुम्ही परिश्रमपूर्वक, तुमच्या शरीराला प्रत्येक पोषक तत्व मिळावे याची खात्री केली आहे आणि यामुळे चांगले आरोग्य मिळावे, बरोबर? दुर्दैवाने, असे होऊ शकत नाही.
समस्या अशी आहे की तुम्ही निवडलेला सामान्य आहार तुमच्या शरीरासाठी इष्टतम असू शकत नाही. याचे कारण असे की आपल्यापैकी प्रत्येकाची विशिष्ट गरज, असंतुलन तसेच भिन्न चयापचय गती.
तर, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही सर्वोत्तम निवड कशी करू शकता?
आपल्या जीवनात निसर्गोपचार आहाराची हीच भूमिका आहे. निसर्गोपचार हे अक्षरशः वेदाइतकेच जुने आहे, जे अंदाजे ३,५०० वर्षे जुने आहे! अथर्ववेदात नैसर्गिक औषधांचे संदर्भ आहेत. मात्र, अलीकडेच याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. कारण जीवनशैली आणि आहाराशी संबंधित विकार आपल्यामध्ये वाढत आहेत.
येथे काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत , जे तुमच्या शंका दूर करण्यात आणि निसर्गोपचार पद्धती आणि त्यावर आधारित आहारामध्ये तुमचे स्वारस्य पूर्ण करण्यात मदत करू शकतात.
१. निसर्गोपचार म्हणजे काय
ही एक औषध प्रणाली आहे जी आपल्या शरीरातील पाच घटक (हवा, पाणी, अग्नि, पृथ्वी आणि अवकाश) संतुलित करून परिस्थिती/रोगांवर उपचार करण्यावर विश्वास ठेवते. ही प्रणाली नुकसान न करणारी आणि वेदनारहित आहे.
उपचारामुळे तुमच्या शरीराला साथ मिळते, ज्यामुळे ते सक्षम होते. औषध न वापरता स्वतःला बरे करण्याची जन्मजात क्षमता वापरण्यास सक्षम करते. ‘औषधे’ अन्न संयोजन, नैसर्गिक औषधी वनस्पती, अनुकूलित आहार आणि आरोग्यदायी पद्धतींचे रूप घेतात. तुम्हाला इतर गोष्टीं बरोबरच धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयी दूर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
२. निसर्गोपचार कोणत्या प्रकारचा आजार किंवा स्थिती बरा करू शकतो
- निसर्गोपचारामध्ये रोगाचे लक्षण हा दृष्टीकोन नसतो. त्यामुळे, रोगी असो वा निरोगी असो, आरोग्य सुधारण्यासाठी किंवा राखण्यासाठी – निसर्गोपचाराकडे जाण्याचे स्वागत आहे.
- निसर्गोपचार प्रतिबंधात्मक उपचार म्हणून उत्तम कार्य करते. तुटलेली हाडे आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या तीव्र परिस्थिती बरे करण्याचा दावा करत नाही, परंतु ते त्यांना रोखण्यास मदत करू शकते. शिवाय, कर्करोगाच्या उपचारांना साथ देण्यासाठी ते प्रभावी ठरले आहे. उदाहरणार्थ, लोकांना केमोथेरपी घेताना, पोषण थेरपीने उत्साही होण्यास, रोगावर मात करण्यास मदत केली आहे.
- मधुमेह, हार्मोनल विकार आणि उच्चरक्तदाब यांसारख्या जुनाट आजारांवरही निसर्गोपचार हा उत्तम उपाय आहे. हे यशस्वीरित्या, या आजार असलेल्या लोकांना मदत करू शकते, कारण ते केवळ लक्षणांवर उपचार करण्याऐवजी विकारांच्या मूळ कारणांना लक्ष्य करते.
सरते शेवटी, सतत गोळ्या घेतल्याने इतर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात; म्हणून स्वतःला बरे करण्याचा नैसर्गिक मार्ग निवडणे योग्य ठरेल. तुमची औषधे समयोजित करण्यासाठी डॉक्टरांच्या नियमित भेटी कमी करण्याची कल्पना करा. त्याऐवजी, आपण आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून आपल्या आरोग्याची जबाबदारी घेऊ शकता!
३. निसर्गोपचारात आहाराची कोणती भूमिका आहे
आहार हा या निसर्गोपचाराचा अविभाज्य भाग आहे. शरीराच्या तीन प्रकृती आहेत – वात, पित्त आणि कफ. तुमच्या प्रकृतीवर आधारित, निसर्गोपचार तुमच्यावर उपचार करण्यासाठी विविध साधने वापरतो. त्यापैकी एक आहार आहे.
तुमच्या प्रकृतीला अनुरूप नसलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरात प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. आहार योजना हे असंतुलन दूर करते, तुमचे शरीर त्याच्या मूळ आणि निरोगी स्थितीत आणते.
उदाहरणार्थ, २५ वर्षीय शंकर (नाव बदलले आहे) यांना मधुमेहाचे निदान झाले असून त्यांची उपाशीपोटी साखरेची पातळी २४० आहे. त्यांची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपचारांचा प्रयत्न केल्यानंतर, त्याच्या मधुमेहावरील उपचारांसाठी तो निसर्गोपचाराकडे वळला. तो म्हणाला की “१० दिवसांच्या उपचारानंतर, जिथे मी निसर्गोपचाराचा आहार घेतला, तेव्हा माझी उपाशीपोटी साखरेची पातळी १४० पर्यंत कमी झाली. आणखी सहा महिन्यांनंतर, ती १०१-१०२ पातळीपर्यंत घसरली. तेव्हापासून, मी माझे औषध बंद केले आहे आणि निर्धारित आहाराला चिकटून आहे!”.
अर्थात, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्रत्येक व्यक्तीची शरीर प्रकृती भिन्न आहे म्हणून वेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देते.
४. निसर्गोपचार आहार मला कशी मदत करू शकतो
तुमच्या जन्मजात कमतरतांवर मात करण्यासाठी तुम्हाला पारंपारिकपणे लिहून दिलेले ‘औषध’ तुमच्यासाठी संकल्पित निसर्गोपचार आहारात असते.
निसर्गोपचार आहार तुमच्यासाठी काय करतो? ते म्हणजे तुमच्या जन्मजात असमतोलांची काळजी घेतो. ह्या असंतुलनाचे मूळ कारण काही खाद्यपदार्थांचा तिटकारा व काहींची लालसा आहे.
उदाहरणार्थ, समजा तुमच्यामधे कॅल्शियमची कमतरता आहे. तुमच्या आहारामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ आणि कॉम्बिनेशन्सचा समावेश असेल जे तुमच्या शरीर व्यवस्थेत त्याचे चांगले शोषण होण्यास मदत करतील. कॅल्शियम सप्लिमेंट्स गोळ्यांच्या स्वरूपात घेण्यापेक्षा हे चांगले आहे.
याव्यतिरिक्त, निसर्गोपचार आहार तुम्हाला मुळांकडे घेऊन जातो, जेथे अन्न हे त्याच्या शुद्ध आणि नैसर्गिक स्वरूपात असते, त्यात मिश्रित पदार्थ, रंग, संरक्षक, रसायने आणि जनुकीय सुधारित वाणाचे अन्नघटक नसतात. हे अन्न तुमच्या प्रणालीमध्ये अधिक प्राण किंवा ऊर्जा असल्याची खात्री करेल, ज्यामुळे तुम्हाला हलके वाटेल. हे आपल्याला स्पष्ट आणि शुद्ध विचार करण्यास सक्षम करते. हे तुमचा आळस आणि थकवा दूर करण्यास देखील मदत करते.
५. माझ्या विशिष्ट स्थितीसाठी तुम्ही चांगला निसर्गोपचार आहार सुचवू शकता का
निसर्गोपचारामध्ये एकच एक अशी आदर्श किंवा सर्वसमावेशक अशी आहारयोजना नाही. कुटुंबातही, प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगवेगळ्या असतील.
शिवाय, प्रत्येक स्थितीसाठी विशिष्ट आहार योजना नाही , जसे की एक मधुमेहासाठी, दुसरा उच्च रक्तदाबासाठी आणि हार्मोनल समस्यांसाठी वेगळा. तथापि, या आहाराचा अवलंब केल्याने आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याची शक्यता आहे.
६. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा मुरुमे घालवायची आहेत,अशा निरोगी लोकांसाठी निसर्गोपचार आहार उपयोगी पडेल का ?
होय, तुमच्या प्रकृतीनुसार, तुमच्या शरीराच्या गरजेनुसार आहार अनुकूलित केला जातो. जर, एकदा तुमचा असमतोल दुरुस्त झाला की तुमची स्थिती स्वतःच स्थिर होईल.
तुमचे डॉक्टर वजन कमी करण्यासाठी आणि मुरुमांच्या समस्यांसाठी निसर्गोपचार आहाराव्यतिरिक्त योग, पोहणे किंवा चालणे यासारखे शारीरिक व्यायाम देखील सुचवू शकतात.
७. निसर्गोपचार आहारामध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारचे पदार्थ आढळतात
निसर्गोपचार आहारामध्ये शक्य तितक्या नैसर्गिक स्थितीच्या जवळ असलेले अन्न समाविष्ट आहे. त्यात मिश्रित, संरक्षक किंवा कीटकनाशके नसतात.
या आहारात तुम्हाला हे पदार्थ मिळू शकतात:
- पौष्टिक अन्न जसे पॉलिश न केलेले तांदूळ आणि बाजरी
- ताजी फळे – शक्यतो हंगामी फळे
- वाफवलेल्या आणि उकडलेल्या भाज्या
- हिरव्या पालेभाज्या आणि सॅलड्स
- औषधी वनस्पती आणि मसाले
- सुका मेवा, वेगन दूध आणि मेवा-आधारित तेल
- तेलबिया
- दुग्धजन्य पदार्थ (पचन क्षमतेनुसार)
- आंबवलेले अन्न पदार्थ
- मीठ त्याच्या नैसर्गिक स्वरूपात – सैंधव किंवा समुद्री मीठ
- नैसर्गिक रस गरासहित किंवा गराशिवाय (रंग किंवा साखरशिवाय)
- पारंपारिक पद्धतीने बनविलेले लाडू जसे काजू, तीळ आणि सुका मेवा वापरून
तुम्हाला ऊर्जा देणारे आणि पोषण देणारे सर्व पदार्थ हे निसर्गोपचार आहाराचा भाग आहेत. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, सांस्कृतिक पार्श्वभूमी, प्रदेश आणि परंपरा भिन्न असतात, त्यामुळे साहजिकच प्रत्येकाचा आहार मेनू भिन्न असतो.
जर तुम्ही उत्तर भारतातील असाल, तर तुमच्या आहारात गव्हावर आधारित पदार्थ, खिचडी आणि लस्सी (ताक) यांचा समावेश असू शकतो. त्या उलट, दक्षिण भारतीयांच्या आहार योजनेमध्ये पोंगल आणि दहीभात यासारख्या तांदूळ-आधारित पदार्थांचा समावेश असू शकतो.
तुम्हाला ऊर्जा देणारे तेच अन्न इतरांना थकवू शकते. उदाहरणार्थ, काही लोक असा दावा करतात की सकाळी प्रथम कॅफीन (पेय) त्यांना दिवसभर ताजेतवाने ठेवते; इतरांचे मत आहे की कॅफीनने त्यांना मळमळते आणि त्यांना आम्लयुक्त बनवते!
८. कोणते खाद्यपदार्थ निसर्गोपचार आहारात असल्यास टाळावे
- सर्व प्रकारची प्रक्रिया केलेली उत्पादने / अन्न जसे की
अ) पांढरी/ब्राऊन साखर – त्या ऐवजी पाम साखर, नारळ साखर, गूळ किंवा मध घेवून.
ब) आयोडीनयुक्त मीठ – त्याऐवजी नैसर्गिक स्वरूपात सैंधव मीठ किंवा समुद्री मीठ वापरा.
- परिष्कृत उत्पादने जसे की पांढरा तांदूळ, मैदा (पीठ) आणि पॉलिश केलेले बाजरी – त्यास बदला लाल किंवा ब्राऊन तांदूळ आणि पॉलिश न केलेली बाजरी वापरा.
- तेल आणि तळलेले पदार्थ – त्याऐवजी भाजलेले (पारंपारिक ओव्हन वापरणे), कोरड्या भाजलेल्या किंवा उन्हात वाळलेल्या पदार्थांचा विचार करा.
- A2 तूप मध्यम प्रमाणात – दिवसातून सव्वा चमचा समाविष्ट केले पाहिजे.
९. फक्त निसर्गोपचार आहारामुळे मला चांगले आरोग्य मिळण्यास मदत होईल का
निसर्गोपचार आहार हा निसर्गोपचाराचा मूलभूत भाग आहे. मात्र, या आहारासोबतच संपूर्ण आरोग्यासाठी निसर्गोपचाराची इतर साधने आहाराबरोबर वापरणे गरजेचे आहे.
त्याचे स्वरूप म्हणून हे करू शकतात
- औषधी वनस्पती
- एक्यूपंक्चर
- एक्यूप्रेशर
- योग
- ध्यान
- प्राणायाम किंवा श्वासोच्छवासाचे व्यायाम
- मर्मा थेरपी – शरीरातील गंभीर बिंदूंवर (ज्याला मार्मा पॉइंट म्हणतात) सौम्य स्पर्श
- मेरु चिकीत्सा – मणक्याला हलका स्पर्श
- पाणी थेरपी
- मड थेरपी – तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढणे चिखलाचे बरे करण्याचे गुणधर्म वापरून
- प्रत्याहार – बाह्य प्रभावांवर प्रभुत्व मिळवणे
… ही फक्त काही साधने आहेत!
निसर्गोपचार तज्ज्ञ तुम्हाला सर्वात योग्य आहार ठरवण्यासाठी नाडी परीक्षा (नाडी निदान) आणि रक्त अहवाल तसेच तपशीलवार प्रश्न आणि तपासणी करतो. तुमची प्रकृती लक्षात घेऊन निसर्गोपचार आहार तयार करण्यात आला असल्याने, तुम्ही उत्तम आरोग्यासाठी तुमच्या मार्गाने आहार खाऊ शकता!
जेव्हा तुम्ही तुमच्या प्रकृती पासून दूर जाता तेव्हा त्याला विकृती म्हणतात आणि हेच अस्वास्थ्यकर परिस्थितीचे मूळ आहे. मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या – अष्टपैलू आरोग्यासाठी, तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या जितके जवळ जाल , तितके तुम्ही आनंदी असाल. ही एक आदर्श कृती आहे!
तुम्ही श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स अँड रिसर्च हॉस्पिटल मध्ये निसर्गोपचार तज्ज्ञला भेट देऊ शकता.
(लिखित डॉ. सूर्य रमेश, निसर्गोपचार तज्ञ, श्री श्री आयुर्वेद हॉस्पिटल आणि आर्ट ऑफ लिव्हिंग शिक्षक यांच्या विस्तृत माहितीसह)