आपणास वारंवार डुलकी येते कां? आपल्या घोरण्यामुळे अजाणतेपणे दुसऱ्यांना त्रास होतो कां ? पडल्या पडल्या झोप लागणारे लोक नशीबवान असतात. एकदा प्राप्त झालेले भाग्य नियोजनाद्वारे आपली दिनचर्या बनू शकते.

ऊर्जापूर्ण, स्वप्न विरहित झोप आपणास पुढील मार्गांनी मिळू शकते.

  1. विजयी मनाने झोपी जा.

    वैज्ञानिक संशोधनांमधून सिद्ध झाले आहे की जेंव्हा आपण अपयशाबद्दलचे विचार मनात ठेवून झोपायला जाता, तेंव्हा हे विचार आपल्या मनात खोलवर रुजतात. हे विचार आपल्या पुढील दिवसावर प्रभाव पाडतात. अशांतता आपल्या झोपेचा ताबा घेते. स्वतः याचा अनुभव घेण्यासाठी आपण काही दिवसांसाठी स्वतःवर हा प्रयोग करून पाहू शकता. झोपण्यापूर्वी आपल्या मनात घोळत असलेले विचार उठल्यानंतर पुन्हा आपल्या मनात येतात. म्हणून झोपण्यापूर्वी आपल्या मनात आपण यशस्वी झालेल्या सकारात्मक विचारांची पेरणी करा. त्यामुळे विश्रांती आपल्या झोपेवर राज्य करेल. दुसऱ्या दिवशी आपण पूर्णपणे उत्साही राहाल.

  2. झोपेसाठी योगासने 😴

    आपल्या दैनंदिन कामांव्यतिरिक्त योगासनांचा सराव आपल्या झोपेचा काळ आणि कार्यक्षमता वाढवतो. या योगासनांमुळे डोळ्यांची जलद होणारी हालचाल मंदावते आणि सहजपणे स्वप्नविरहित आरामदायी झोप लागते.

    सक्रिय रहा (रॉक आणि रोल)

    दिवसातील काही वेळ व्यायाम करा. पवनमुक्तासन (रॉक आणि रोल) पाठीवर झोपून आपले दोन्ही गुडघे दुमडून आपल्या छातीजवळ आणा. आपले दोन्ही हात दोन्ही पायांभोवती मिठी मारल्यासारखे बांधा. हळुवारपणे श्वास आत घेऊन आपले शरीर उठून बसण्याच्या स्थितीत आणा आणि श्वास सोडत पुन्हा पूर्वस्थितीत (पाठीवर) या . असे दोनदा करा. अंतत: पाठीवर झोपून आपले हात आणि पाय जमिनीवर मोकळे सोडा.

    • वज्रासन
    • शिशुआसन
    • मार्जारासन
    • विपरीत करणी
    • योगनिद्रा
       (योगनिद्रेने योगाभ्यासाची सांगता करा.)
  3. झोपेसाठी मुद्रा

    आरामात बसा (पद्मासन किंवा सुखासन). मुद्रांचा सराव शांत आणि हळुवार श्वासांमध्ये ५ ते १५  मिनिटे करायचा आहे. मुद्रांचा सराव करताना उज्जयी श्वासाचा अवलंब करावा. हळुवारपणे शरीरात वाहणाऱ्या उर्जेच्या प्रवाहाकडे लक्ष दया.

    • शक्ती मुद्रा – झोपेसंबंधी आजारांसाठी.
    • चिन मुद्रा- झोपेची संरचना सुधारते.
    • आदी मुद्रा-घोरणे कमी करते.
  4. आयुर्वेद

    आयुर्वेदिक औषधी पद्धतीमधील शंखपुष्पी प्राश (सिरप) चांगल्या झोपेसाठी मदत करतो. आयुर्वेदिक औषधीच्या मदतीने पोट साफ झाल्याने चांगली झोप लागते. त्रिदोषांचे संतुलन करणारे त्रिफळा चूर्ण आणि गोळ्या पचन क्रिया सुधारण्यात मदत करतात.

    वेगवेगळ्या वेळेच्या पाळ्यां मध्ये काम करणारे आणि जेटलॅग अनुभवणाऱ्या लोकांना झोपेच्या समस्या टाळता येत नाहीत. आयुर्वेदाच्या उपचारांमुळे त्यांची झोप स्वप्नविरहित व आनंददायी होऊ शकते. नेहमी आयुर्वेदिक उपचार घेत राहा. ‘श्री श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स आणि रिसर्च हॉस्पिटल’मधील आयुर्वेद विशेतज्ञ आणि निसर्गोपचार तज्ञ यांचा ऑनलाईन सल्ला घेण्याचा मुख्य फायदा म्हणजे निद्राविकाराच्या उद्‌गमावर उपचार केले जातात. नाडी परीक्षेद्वारे तुमच्या शरीरातील कफ-वात-पित्ताची चिकित्सा केली जाते.

  5. झोपेसाठी सुखदायक संगीत

    जसे लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाईगीत उपयोगी ठरतात तसेच मंद संगीत मनाला शांत करून झोपण्यास प्रवृत्त करते, असे संशोधनामध्ये दिसून आले आहे. परंतु कानामध्ये इअरपॉड्स लावून संगीत ऐकत झोपू नका त्याऐवजी स्पीकर वापरा. जास्त काळापर्यंत इअरपॉड वापरल्याने तुमच्या कानाला कायमस्वरूपी इजा होवू शकते. साधारणत: ६० ठोके प्रति मिनिट ताल असलेले आपल्या आवडीचे संगीत (उदा.अभिजात संगीत किंवा मंद वाद्यसंगीत) निवडा. बिछान्यावर तुमच्या आवडत्या कुशीवर झोपा आणि सुंदर सुखदायक संगीत ऐका. यामुळे आपणास आराम वाटून सहजपणे झोप लागेल.

  6. निद्रापूरक वास्तुशास्त्र

    झोपण्याच्या दिशेबद्दलच्या प्राचीन मतांची वैज्ञानिक बाजू समजून घ्या.

    उत्तरेकडे डोके करून झोपणे  निषि‌द्ध मानले जाते. कारण त्यामुळे मेंदूमध्ये लोहाचे घनीभवन होऊन रक्ताभिसरणात अडथळे, मानसशास्त्रीय त्रास, उच्च रक्तदाब, निद्रानाश होतो. पूर्वेकडे डोके करून झोपणे विदयार्थ्यांना फायदेशीर ठरते. कारण त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, एकाग्रता वाढते आणि आरोग्य सुधारते. मध्यस्थ लोक पूर्वेकडे डोके करून झोपणे पसंत करतात. आरोग्याच्या तक्रारी असल्यास दक्षिणेकडे डोके करणे चांगले असते.

    कुशीवर झोपल्यामुळे आपली सूर्यनाडी (उजवी नाकपुडी) आणि चंद्रनाडी (डावी नाकपुडी) सक्रिय होऊन शरीरातील प्राणाचा प्रवाह वाढतो. त्यामुळे झोपून उठल्यानंतर आपणास ऊर्जापूर्ण वाटते.

  7. ध्यान

    २० मिनिटांचे ध्यान तुम्हाला आठ तासाच्या चांगल्या झोपेइतकी विश्रांती देते.

    थोडा रिकामा वेळ काढा.आणि याचा अनुभव घ्या. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला सारा. कानात आपले इअरपॉड्स घाला आणि आरामात बसून गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शित ध्यानाच्या सूचनांनुसार चांगल्या झोपेसाठी ध्यान करा.

    निसर्ग आपल्याला आपल्या नकळत मौनात जाण्यास भाग पाडतो, ज्याला ‘झोप /निद्रा’ म्हणतात. झोपेमुळे आपणास ऊर्जा मिळते. जेव्हा आपण सजगपणे मौनात जातो, त्याला ‘ध्यान’ म्हणतात. ध्यानामुळे आपणास जास्त ऊर्जा मिळते आणि सूक्ष्म मितींची दारे उघडण्यास मदत होते. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या ‘उच्च स्तरीय ध्यान’ कार्यक्रमात आपण सजगपणे मौनात जातो. ध्यानामुळे आपल्या चेतासंस्थेत खोलवर असलेला ताण काढून टाकायला मदत होते. गहिऱ्या ध्यानाद्वारे आपण खोल विश्रांतीमध्ये स्थिर होतो.

मंद प्रकाशाची भैरवी

मेलॅटोनिन नावाचे झोपेचे नियंत्रण करणारे संप्रेरक शरीर आणि मनाला जलद झोपण्यासाठी संकेत देते. हे संप्रेरक अंधारात स्त्रवते.त्यामुळे झोपण्यापूर्वी काही वेळ मंद प्रकाशात वावरणे चांगले ठरते. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पडदयावर (स्क्रीन वर ) नाईट मोड चालू करा. अंधाऱ्या किंवा मंद प्रकाशाच्या खोलीत झोपा. त्यामुळे आपली झोप नियंत्रित होते आणि शरीरातील विषारी द्रव्ये देखील मोकळी होतात.

चांगली झोप आणि आराम मिळण्यासाठीची शक्तीशाली तंत्र शिकण्यासाठी ‘चिंता आणि निद्रा विकारांपासून मुक्ती’ मिळवण्याच्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिबिरात सामील व्हा.

चांगली झोप मिळविण्या विष‌यीच्या मार्गाबद्दल नेहमी विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या यशस्वीपणाचे विचार आणि तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या गोष्टींचा विचार तुमच्या मनाला विश्राम देऊन चांगली झोप मिळवून देतात.
झोपण्यापूर्वी काही आसने जसे की पवनमुक्तासन, शिशुआसन, वज्रासन, मार्जरासन, विपरित करणी करा आणि शेवटी योगनिद्रा ध्यान केल्यामुळे चांगली झोप येते.
सुदर्शन क्रिया™ (श्वासाचे शक्तिशाली तंत्र) मुळे झोपेची गुणवत्ता सुधारते. उज्जयी श्वासात शक्ती, चिन,आदी मुद्रेचा सराव चांगल्या झोपेसाठी आदर्श आहे. आनंददायी संगीतामुळे आराम वाटून सहजपणे झोप येते. झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवावे. कधीही उत्तर दिशेकडे डोके करून झोपू नये. झोपण्यापूर्वी गरम पाण्याने आंघोळ करणे काहीजण पसंद करतात.
रोज रात्री गाढ झोपेसाठी ध्यान करा. तुम्ही योग निद्रा सारखे मार्गदर्शित ध्यान करु शकता.
तळपायांना कोमट तेलाने (नारायण तेल) मालिश केल्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
मेलाटोनिन, झोपेचे नियमन करणारा हार्मोन, अंधारात सोडला जातो. त्यामुळे झोपेच्या वातावरणासाठी तुमचे दिवे मंद करणे चांगले! स्क्रीनवर नाईट मोड फिल्टर वापरा. अंधाऱ्या खोलीत किंवा अंधुक प्रकाश असलेल्या खोलीत झोपा. त्यामुळे तुमच्या झोपेचे नियमन करा तसेच विषारी पदार्थ सोडा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *