बेंगलुरू, भारत. : मुसळदार पाऊस, भूस्खलन आणि तीर्थयात्रींचे संरक्षण या मुद्द्यांवरून अमरनाथ यात्रेकरूंनी आपली तीर्थयात्रा २०१९ पर्यंत लांबणीवर टाकावी, अशी विनंती अध्यात्मिक गुरु आणि आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी यांनी आज केली. श्री श्री रवि शंकर जी श्री अमरनाथ श्राईन बोर्ड (SASB) चे सदस्य आहेत.
मुसळदार पाऊस आणि भूस्खलनामुळे अमरनाथला जाणारे दोन्ही रस्ते बाधित झाले आहेत. श्री अमरनाथ श्राईन बोर्डाचे चेअरमन, गव्हर्नर श्री एन.एन. वोरा, भारतीय सेना आणि सीमा सुरक्षा दलाच्या पराकोटीच्या प्रयत्नानंतर देखील दोन्ही मार्ग लवकर यात्रेसाठी खुले होण्याची शक्यता नाही.
गुरुदेव श्री श्री रवि शंकर जी म्हणाले कि, “जे यात्रेकरू तिथे पोहोचले आहेत त्यांना अतोनात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून मी सल्ला देतो कि, जे श्रद्धाळू यावर्षी अमरनाथ यात्रा करू इच्छितात त्यांनी आपल्या यात्रेबाबत पुनःविचार करावा आणि आपल्या जागेवर थांबूनच ध्यान आणि प्रार्थनेद्वारे भोलेनाथांना आवाहन करावे.”