अध्यात्म म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांसाठी. काहीजण ते धर्माशी जोडतात आणि काही महासत्तेशी किंवा निसर्गाशी जोडतात, तर काही जण ते आपल्या अंतर्मनाशी जोडलेले आहे असे मानतात. तुम्हाला ते कसेही जाणवले तरी अध्यात्माचे फायदे बरेच आहेत. तुमच्यामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यापासून ते तुम्हाला जीवनात अधिक समाधानी बनवण्यापर्यंत, अध्यात्म बहुआयामी आहे.

या प्राचीन भारतीय सभ्यतेमध्ये विज्ञान आणि अध्यात्म कधीच वादात सापडले नाहीत, परंतू केवळ जीवनाच्या विविध पैलूंचा विचार करतात करतात, एक भौतिक आणि दुसरा सूक्ष्म. ते परस्परविरोधी नसून एकमेकांना पूरक आहेत. योग्य जगण्यासाठी आणि आपली खरी ओळख पटण्यासाठी अध्यात्म अत्यंत आवश्यक आहे.

भौतिक गोष्टी समजून घेणे हे विज्ञान आहे आणि ‘मी कोण आहे’ हे समजून घेणे म्हणजे अध्यात्म

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

अध्यात्म महत्त्वाचे का आहे

शेवटी, आपली मूळ ओळख आध्यात्मिक नाही कां, मग आपल्याला त्याची जाणीव असो अथवा नसो. अध्यात्म आपल्याला आपल्या आंतरिक स्त्रोताशी जोडले जाण्यात आणि भूतकाळातील वेदना आणि भविष्यातील चिंतांना न जुमानता वर्तमान क्षणी आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यास मदत करते.

तुम्ही जीवनाचा अर्थ शोधता का?

तुम्ही त्या असीम शांततेसाठी भुकेले आहात का?

तुम्ही प्रार्थना आणि ध्यान करता तेव्हा तुम्हाला शांती मिळते का?

तुम्ही सहानुभूती दाखवता आणि इतरांना मदत करता तेव्हा तुम्हाला खूप समाधान वाटते का?

जेव्हा तुम्ही उच्च शक्तीला शरण जाता तेव्हा तुम्हाला सुरक्षिततेची भावना वाटते का?

तुम्ही वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होय असल्यास, तुम्ही खरोखर आध्यात्मिक आहात.

शांततेने जगण्यासाठी अध्यात्म आवश्यक आहे. आत्म्याचे पालनपोषण करणारी कोणतीही गोष्ट म्हणजे अध्यात्म. योग्य विश्रांती, थोडे ज्ञान आणि आपली दृष्टी व्यापक करणे हे सर्व अध्यात्माचे भाग आहेत. आणि हे सर्व सुसंस्कृत आनंदी जीवनासाठी आवश्यक आहे.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

आध्यात्मिक सराव सुधारण्याचे ७ मार्ग

१. ध्यान

तुमच्या सभोवतालच्या गोष्टींवर विचारपूर्वक प्रतिक्रिया करण्यात ध्यान तुम्हाला मदत करते. ते तुमच्या संवेदना शांत करते आणि परिस्थितींवरील तुमच्या प्रतिक्रिया सुधारते. अगदी पाच मिनिटे ध्यान केल्याने तुम्हाला तणाव, चिंता आणि राग, दुखापत, अहंकार, मत्सर इत्यादी नकारात्मक भावनांशी लढण्यास मदत होऊ शकते. तुम्ही सध्या कुठे आहात, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींची जाणीव असणे आणि तुम्ही काय करत आहात यासारखे थोडे तपशील जागरुकतेने सराव करण्याचे काही मार्ग आहेत. ध्यानधारणेद्वारे जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढविली जाते.

२. योग आणि प्राणायाम

योग आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवतो आणि आपले चैतन्य वाढवतो, आपल्याला आपल्या अंतर्मनाशी सहजपणे जोडण्यास मदत करतो. गाभा मजबूत करून शरीराला लवचिकता प्रदान करण्यासाठी योग हे एक उत्तम तंत्र आहे. प्राणायाम आपला श्वास सुधारतो, आपली जागरूकता वाढवतो. अध्यात्माच्या मार्गावर प्रगती करायची असेल तर योग आणि प्राणायाम आवश्यक आहेत.

३. करुणा आणि क्षमा

जेव्हा तुम्ही तुमचे जीवन भौतिक सुखांपासून दूर अध्यात्माकडे वळवता तेव्हा तुम्ही करुणा, क्षमा आणि प्रेम जोपासता. तुम्ही इतरांची काळजी घेतात, कारण तुम्ही इतरांना वेगळे म्हणून पाहत नाही. आपुलकी विकसित होते, हळूहळू तुम्हाला त्या एका अंतर्निहित दैवी धाग्याची (दैवी चेतना) जाणीव करून देते, जी आपल्या सर्वांना एकत्र बांधते.

अध्यात्म म्हणजे जगातील सर्व लोकांशी आपुलकीची भावना.

गुरुदेव श्री श्री रवि शंकर

४. समाधान आणि कृतज्ञता

कृतज्ञता अंगीकारा आणि तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा तुम्हाला काय दिले आहे ते नेहमी लक्षात ठेवा. अध्यात्मिक दृष्टीकोनातून, जो समाधानी आहे तो सर्वात श्रीमंत मानला जातो. जीवनाच्या अनेक टप्प्यांत उतरून आणि ऐषोआरामांसाठी तहानलेले लोक कधी कधी विसरतात की एक दिवस सर्वकाही नाहीसे होणार आहे. जीवनात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते हे जाणून घेणे आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहणे तुम्हाला विपुलतेची जाणीव करून देण्यात आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करेल.

जेव्हा तुमच्यात कृतज्ञता टिकून राहते, तेव्हा तीच कृतज्ञता तुमच्या कृपेच्या रूपात बाहेर पडते.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

५. तालबद्ध श्वसन

सुदर्शन क्रिया सारख्या लयबद्ध श्वासोच्छवासाचे तंत्र तुमच्या फुफ्फुसाचा विस्तार करण्यास मदत करते, तुम्हाला तणावाच्या बंधनातून मुक्त करते आणि तुम्हाला जीवनाची चांगली बाजू दाखवते. ती तुमच्यातली ऊर्जा वाढवते आणि तुम्हाला अधिक आत्मविश्वास, शांत आणि वर्तमान क्षणात ठेवते. इतकेच नाही तर सुदर्शन क्रिया आजारांपासून बरे होण्यास मदत करुन प्रतिकारशक्ती सुधारते.

६. निःस्वार्थ सेवा

निःस्वार्थ सेवा हा अध्यात्माचा अत्यावश्यक घटक आहे. अध्यात्माचा सराव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे इतरांना मदत करणे. तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी सेवा करणे आणि इतर लोकांना मदत करणे हे करू शकता. वंचितांना मदत केल्याने आणि समाजाला परत दिल्याने खूप समाधान मिळते. याने तुम्ही किती भाग्यवान आहात हे तुम्हाला कळते आणि तुम्हाला जमिनीवर ठेवते आणि नम्र ठेवते.

सेवेचा सर्वोत्तम प्रकार म्हणजे एखाद्याच्या मनाची स्थिती सुधारणे.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

७. आत डोकावून बघा

तुमची ऊर्जा जास्त चांगल्या प्रकारे वापरण्यासाठी कशाची मदत होते हे शोधण्यासाठी अंतर्मनात डोकावून पहा. हा दैनंदिन जीवनातील अनुभव आहे का? गाणे, चित्रकला किंवा नृत्य करणे यासारखा तो एक छंद आहे कां ? लोक डोंगरावर फिरतात आणि निसर्गासोबत वेळ घालवतात. हे खूप उपचारात्मक असल्याचे म्हटले जाते. तुम्हाला विश्वास ठेवता येईल अशा लोकांसोबत तुमच्या दाटलेल्या भावना व्यक्त करा. अध्यात्माचा अर्थ शोधण्यासाठी अंतर्मनात डोकवा. तुम्हाला सुखदायक ‘तंत्र’ काय आहे ते शोधा आणि त्याचा पाठपुरावा करा.

शेवटची टीप

अध्यात्मिक शक्ती तुम्हाला जीवनातील किरकोळ आणि मोठ्या अडथळ्यांना बळी न पडता जगण्यास मदत करते. अध्यात्मासोबत, तुम्हाला समजते की मानवी जीवनाचा परस्पर संबंध आहे आणि या लढाईत तुम्ही एकटे नाही आहात. तुम्ही आयुष्याचे अधिक चांगल्या पद्धतीने मूल्यांकन करता आणि योग्य मूल्यांसह हेतुपुरस्सर जगता. जीवनातील समस्यांवर विजय मिळवणे यापेक्षा दुसरी सुटका कोणती असू शकते?

असा आनंद मिळवणे जो तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे अध्यात्माचे ध्येय आहे.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *