हस्त = हात; पाद = पाय; आसन शब्द = हस्तपादासन
हस्तपादासन | Standing Forward Bend (Hastapadasana)
- हात शरीरासोबत ठेऊन पाय एकत्र ठेऊन ताठ उभे राहूया.
- दोन्ही पायांवर समान वजन राखा.
- श्वास घेत दोन्ही हात वर घेऊन जाऊया.
- श्वास सोडत पायाकडे पुढे झुकुया.
- दीर्घ श्वसन सुरु ठेऊन २० ते ३० सेकंद या स्थितीत थांबूया.
- पाय आणि मणका ताठ राहूद्या, हात पावलांवर किंवा पायांशेजारी जमिनीवर टेकवा.
- श्वास सोडत छाती गुडघ्यांकडे नेऊया. नितंब वर उचलुया. टाचा खाली दाबून धरू, डोके पायांकडे सैल सोडून देऊ, दीर्घ श्वसन सुरु ठेऊ.
- श्वास घेत हात समोरून वर घेऊ, हळुवार उभे राहू..
- श्वास सोडत हात मांड्यांशेजारी खाली घेऊ.
हस्तपादासानाचे लाभ | Benefits of the Standing Forward Bend
- पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात.
- रक्तसंचार वाढल्याने मज्जासंस्था पुनर्रुजीवित होते.
- पाठीचा कणा मजबूत बनतो.
- पोटातील अवयव मजबूत बनतात.
हस्तपादासन कोणी करू नये | Contraindications of the Standing Forward Bend (Hastapadasana)
पाठीचे दुखणे, स्पोंडीलायटीस, सर्वायकल दुखणे, पाठीच्या कण्याचे दुखणे असणाऱ्यांनी हे आसन करू नये.
उत्तानासन (हस्तपादासन) वीडियो | Uttanasana (Hastapadasana) Video
<< अर्धचक्रासन | Ardha Chakrasana कटिचक्रासन | Katichakrasana>>
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रा मध्ये शिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा..t info@srisriyoga.in.