Kona =Angle; Asana = Pose/Posture
(This posture is Pronounced as:konah-sanah)
कोनासन कसे करावे | How to do Konasana
- कंबरे एवढे पायात अंतर घेऊन ताठ उभे राहूया. हात शरीराजवळ असुद्या.
- श्वास आंत घेत डावा हात, हाताची बोटे छताकडे करत वर उचलुया.
- श्वास सोडत उजवीकडे झुकुया, पहिल्यांदा मणक्यातून, मग कंबर डावीकडे घेत आणखी झुकुया.
- कोपर ताठच ठेवत मान वळऊन डाव्या हाताच्या तळव्याकडे पाहूया.
- दीर्घ श्वसन सुरु ठेऊया.
- श्वास घेत सरळ होऊया.
- श्वास सोडत डावा हात खाली घेऊया.
- उजव्या हाताने संपूर्ण आसन पुन्हा करूया.
कोनासानाचे लाभ | Benefits of Konasana
- शरीराच्या दोन्ही बाजू आणि मणक्याला ताण बसतो.
- हात, पाय आणि पोटातील अवयव बळकट बनतात.
- पाठीचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
- अपचनाच्या तक्रारी दूर होतात.
- सायटिकाचे दुखणे कमी होण्यास मदत होते.
कोनासन कोणी करू नये |Contraindications of the Konasana
तीव्र पाठदुखी आणि ज्यांच्या मान तसेच पाठीच्या मणक्यातील अंतर कमी जास्त झाले असेल(स्पोंडीलायटीस)
त्यांनी हे असं करू नये.
कोनासन विडियो |Konasana video
पूर्वीचा लेख:Sideways Bending Using Both Arms
पुढचा लेख:Corpse Pose
योगाभ्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी लाभदायक असला तरी तो औषधोपचारांना पर्याय बनू शकत नाही. योगासनांचा अभ्यास आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करणे योग्य होईल. काही शारिरीक वा मानसिक त्रास असतील तर वैद्यकीय सल्ला व आर्ट ऑफ लिविंग प्रशिक्षकांच्या सल्ल्याने योगाभ्यास करावा. श्री श्री योग कोर्स जवळच्या आर्ट ऑफ लिविंग केंद्रामध्येशिकू शकता. विविध शिबिरांच्या माहितीसाठी तसेच आपल्या प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी info@artoflivingyoga.in या संकेत स्थळावर संपर्क करा.