बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. इतकी सामान्य की आपल्यापैकी बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहित आहे का की नियमित बद्धकोष्ठतेमुळे ओटीपोटाचे आजार आणि पोटाचे विकार होऊ शकतात? यामुळे समस्येकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे करण्यासाठी, त्याची कारणे आणि लक्षणे समजून घेऊया.

बद्धकोष्ठता: लक्षणे आणि कारणे

बद्धकोष्ठता म्हणजे फक्त आतड्याची हालचाल नाही किंवा थोडीशी हालचाल होत नाही. त्याऐवजी, त्याची उपस्थिती अनेक लक्षणांद्वारे जाणवते:

  1. क्वचित किंवा काही आतड्याची कमी हालचाल
  2. आतड्याची हालचाल करताना ताण येणे
  3. कठीण किंवा लहान असा मल होणे
  4. पोटदुखी आणि पेटके, ओटीपोटात दुखणे
  5. फुगलेले पोट
  6. डोकेदुखी

या लक्षणांचे मूळ कारण अस्वास्थ्यकर जीवनशैली आहे, ज्याच्या गुणधर्मांमध्ये हे समाविष्ट आहे:

  • कामाच्या अयोग्य वेळा
  • विश्रांतीसाठी कमी वेळ.
  • जंक फूड / आरोग्यास हानिकारक आहाराचे अति सेवन.
  • ताजी फळे आणि हिरव्या पालेभाज्या कमी असलेला आहार.
  • पाण्याचे कमी सेवन.

योग – बद्धकोष्ठतेसाठी तारणहार

बद्धकोष्ठता बरी करण्याचे हे विविध नैसर्गिक मार्ग आहेत. पण, एक मराठी म्हण अगदी बरोबर आहे की, उपचारापेक्षा प्रतिबंध बरा.

बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सोपे उपाय

  1. ताज्या पालेभाज्या आणि फळे यांसारखे भरपूर तंतुमय पदार्थ खा.
  2. भरपूर पाणी प्या. सकाळी गरम द्रवपदार्थांचे सेवन खूप उपयुक्त ठरू शकते.
  3. दैनंदिन आतड्यांसंबंधी हालचाल करण्यासाठी एक नित्यक्रम निश्चित करा. उपचारापेक्षा नेहमीच चांगले.

तुमच्या जीवनात बद्धकोष्ठता पुन्हा येण्यापासून रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमितपणे बद्धकोष्ठतेसंबधी योगासनांचा सराव करणे.

रोजच्या काही मिनिटांच्या योगाभ्यासामुळे शौचास न होणे, जोर लावावा लागणे आणि पोट फुगणे टाळता येते.

योगामुळे आपल्या शरीराचे पुनरुज्जीवन होण्यास आणि प्रणालीमध्ये रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढण्यास मदत होते. बहुतेक योगासनांमध्ये ओटीपोटाची हालचाल समाविष्ट असल्याने, योगाभ्यास बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून मुक्त होण्यास खरोखर मदत करू शकतो.

बद्धकोष्ठतेसाठी योग

बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी येथे काही योगासने दिली आहेत ज्यांचा नियमितपणे सराव केल्यास, शौचास सामान्य होऊ शकते.

  1. मयुरासन
  2. अर्ध-मत्स्येंद्रासन
  3. हलासन
  4. पवनमुक्तासन
  5. बद्ध कोनासन

१. मयुरासन

  • पचन सुधारते
  • हानिकारक अन्नाचे परिणाम नष्ट करते.
  • आंतर-उदर दाब वाढवते
  • प्लीहा आणि यकृताचे वाढणे कमी करते

२. अर्ध-मत्स्येंद्रासन

Ardha Matsyendrasana inline
  • स्वादुपिंड, यकृत, प्लीहा, मूत्रपिंड, पोट आणि चढत्या आणि उतरत्या मोठ्या आतड्यांना उत्तेजित करते.

३. हलासन

halasana - inline

हलासना बद्दल अधिक जाणून घ्या

  • या आसनामुळे यकृत आणि आतड्याला आराम मिळतो
  • ओटीपोटाच्या भागात रक्ताभिसरण वाढवते आणि पचनशक्ती सुधारते

४. पवनमुक्तासन

Pawanmuktasana - inline

पवनमुक्तासन कसे करावे.

  • गॅस मोकळा करते
  • ऍसिडीटी/ पित्त आणि अपचना पासून आराम
  • अपचनासारखे विकार बरे होतात

५. बद्ध कोनासन

Badhakonasana inline
  • गॅस, गोळा येणे, पेटके येणे यापासून आराम मिळतो
  • तणाव कमी होतो

म्हणून काळजी करणे थांबवा आणि सराव सुरू करा! काही मिनिटांच्या योगामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते! आपल्या आहाराच्या सवयी सुधारण्यास विसरू नका. तंतुमय अन्न, फळे आणि भाज्या आणि पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे सर्व बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करेल.
बद्ध कोनासनाचे फायदे.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *