पाठदुखी कशामुळे होते ? फार वेळ बसून अभ्यास केला, किंवा खेळताना दुखापत झाली की पाठदुखीचा त्रास होतो. सध्याची जीवनशैली दगदगीची व तणावपूर्ण आहे. तिला सामोरे जाताना तरुण आणि प्रौढांमध्ये पाठ व कंबरदुखीच्या तक्रारी जाणवत आहेत. मांडी व पोटरी मधून जाणाऱ्या शिरेच्या दुखण्यामुळे (सायटिका) पाठदुखी उद्भवते.तुम्हाला माहीत आहे का ? की भारतामध्ये कंबरदुखी ही एक चिंताजनक बाब आहे. जवळजवळ साठ टक्कें लोकांनी त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास सहन केलेला असतो.

अन्नाचे अपुरे पचन व वाताचे असंतुलन यामुळे पाठदुखी – ज्याला आयुर्वेदात ‘ कटिग्रह’ म्हणतात, सुरु होते. पचनसंस्था बिघडल्यामुळे विषद्रव्ये (आम) तयार होतात, शरीरात आम व वाताचे प्रमाण वाढते,त्यातून शेक्टी पाठदुखी सुरु होते.

आयुर्वेदिक उपचार पद्धतीमुळे पाठदुखीचा त्रास मुळातून कमी होतो. एवढेच नाही तर एकंदरीत आरोग्य व शरीर स्वास्थ्य राखले जाते.स्नायू बळकट होतात व रोग्याला जगण्यासाठी नवीन उर्जा मिळते.

पाठदुखीसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती

पाठदुखी बरी होण्यासाठी खालील विविध आयुर्वेद उपचार पद्धती आहेत –

  • अभ्यंग – अभ्यंग म्हणजे कोमट तेलाने शरीराला ,विशेषतः कमरेला मसाज करणे.यामुळे शरीरातील पेशींना उर्जा मिळते.एकदा शिकल्यावर पेशंटला स्वतःचा स्वतः मसाज करता येतो.
  • बस्ती – या पद्धतीने शरीरातील विषवत पदार्थ बाहेर काढून टाकले जातात. विशिष्ट वनौषधी गुदद्वारावाटे किंवा योनीमार्गातून शरीरात सोडतात व विषद्रव्ये बाहेर काढली जातात.
  • कटिबस्ती – विशिष्ट औषधी वनस्पतींचे तेल कोमट करुन पाठीला व कमरेला लावतात.
  • स्नेहबस्ती – औषधी तेलाचा एनिमा देऊन शरीरशुद्धी करतात.शरीरात साठलेली विषद्रव्ये बाहेर निघतात.
  • कास्यबस्ती – यात औषधी काढा वापरुन एनिमा देतात.
  • आलटून पालटून गरम आणि गार शेक घेणे – दुखापतीमुळे किंवा मार लागल्यामुळे पाठदुखी झाली असेल तर अशावेळी लगेचच बर्फाने शेकल्यास फायदा होतो.शस्त्रक्रियेनंतरच्या दुखण्यामध्ये बर्फाचा वापर करून दुखणे कमी करता येते.बर्फ फडक्यात गुंडाळून किंवा बाजारात मिळणारी बर्फाची पिशवी वापरु शकता. अनेक प्रकारच्या कंबरदुखीत शेकण्यामुळे दुखणे कमी होऊन बरे व्हायला मदत होते. शेकण्यासाठी पिशवी वापरणे किंवा फडक्याची घडी वापरणे,गरम पाणी किंवा गरम जेलीचा पॅक वापरणे,असे सोपे व कमी खर्चिक उपाय आहेत.काही रुग्णांना यापैकी एखाद्या प्रकाराने सुद्धा आराम पडतो.तुम्ही आलटून पालटून गरम व गार शेक घेऊ शकता.
  • मर्म उपचार पद्धती – आपल्या शरीरात असे काही बिंदू असतात की जिथे सूक्ष्म जीवन उर्जा कार्य करत असते. आपल्या विचारांचा परिणाम शरीरावर होत असतो, असे मर्मबिंदू मूलभूत स्वरुपात असतात. मानसिक ताणतणावामुळे सूक्ष्म ऊर्जेच्या मार्गात अडथळे येतात, उर्जा कमी होते.अशा मर्म बिंदू ना हळुवारपणे स्पर्श करुन भावनिक अडथळे दूर केले जातात.त्यामुळे जीवन उर्जा संबंधित अवयवांकडे व पेशींकडे वाहून नेली जाते.अशाप्रकारे नवीन निर्माण झालेला उर्जा प्रवाह शरीराला ताजेतवाने करतो.
  • मेरु चिकित्सा -पाठीच्या कण्याच्या आजारावर हा छान उपचार आहे.शरीरातील इलेक्ट्रिकल सर्किट वर याचा चांगला परिणाम होतो.त्या भागातील सूक्ष्म स्तरावर जे असंतुलन असते,त्यावर मेरुचिकित्सेचा उपचार म्हणून चांगला उपयोग होतो.शरीरातील विविध द्रव्ये (fluids), पाठीच्या कण्यातील द्रव्ये,हाडांची रचना व ठेवण यावर मेरु चिकित्सेचा उपयोग होतो.बांधा सुयोग्य होतो व त्यामुळे पाठदुखी थांबते.  “फक्त आजारी लोकांसाठीच नाही,तर निरोगी लोकांनाही मेरुचिकित्सा उपयोगी आहे.निरोगी व्यक्तींनाही मेरुचिकित्सेचा छान अनुभव येतो व त्यांना अधिक उत्साही वाटते!”, असे गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात.
  • स्वेदन – यात औषधी वनस्पतींची वाफ घेऊन घामाद्वारे विषद्रव्ये बाहेर काढली जातात.
  • धान्याम्लधारा – दुखऱ्या भागावर औषधी वनस्पती युक्त द्रवाची धार धरुन उपचार केला जातो.
  • चूर्ण पिंड स्वेद – औषधी चूर्णांची पोटली करुन (चूर्ण फडक्यात बांधून घेऊन) शरीराला मसाज केला जातो
  • पत्रपोट्टली स्वेद – वातशमन करणाऱ्या औषधी पानांची वस्त्रात पोटली करुन हा उपचार करतात.
  • गरम तेलाचे अभ्यंग – हे तेल आणि उष्णता उपचाराचा समावेश असलेले एक मालिश आहे. हे आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून ७-२१ दिवसांसाठी केले जाते.
  • षष्टिक शाली पिंड स्वेद – यामध्ये विशिष्ट तांदळाचा भात व औषधी वनस्पती वापरुन पोटलीने (वस्त्रात गुंडाळून) शेक देतात.यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतात,दुखणे थांबते व रक्तप्रवाह सुधारतो.
  • पिचू – कापडाचे फडके (वस्त्र) गरम औषधी तेलात बुडवून दुखऱ्या भागावर बांधतात .तेल वरचेवर बदलून पिचू दिला जातो
  • रक्तमोक्षण – दंडातील किंवा गळ्याजवळच्या रक्तवाहिनी मधून दूषित रक्त बाहेर काढले जाते.दूषित रक्त बाहेर निघाल्याने पाठीच्या कण्याला आराम मिळतो.

आयुर्वेदिक जीवनशैली

  • ताजे,गरम व पचनास हलके अन्न खाणे.त्यात हळद, व्हलेरियन वनस्पती (valerian), होपस्,(hops), कृष्ण कमळ (passion flower), कॅमोमाईल (chamomile),यांचा समावेश असावा.यामुळे जळजळ थांबते व मानसिक तणाव कमी होतो.
  • कोरडे अन्न खाऊ नका…उदा. चिप्स, नमकिन,कुकीज,बिस्कीट,टोस्ट.
  • वातसंतुलन नीट राहील असा आहार घ्या. उदा. गायीचे तूप,आंबट व खारट पदार्थ,नैसर्गिक गोड पदार्थ,धान्य, सरबतं,गोड फळे इत्यादी वातशामक पदार्थ .
  • अति व्यायाम टाळा. अति क्रियाशीलता,धावपळ यामुळे वातसंतुलन बिघडते.
  • योग आणि नाडीशोधन प्राणायाम करा.
  • थंड जागी राहू नका. फ्रीज मधील अन्न खाऊ नका.
  • तिखट,कडू व तुरट चवीचे खाऊ नका.
  • शरीराची योग्य ठेवण कशी असली पाहिजे ते माहीत करुन घ्या.

तुम्हाला माहीत आहे का ? शरीराचा प्रत्येक अवयव पाठीच्या कण्याशी निगडित आहे.पाठीच्या कण्याचे आरोग्य कसे राखावे,त्या संबंधित आजारातून बरे कसे व्हावे,यासाठी आमचे तज्ञ तुमच्यासाठी मोफत वेबिनार घेतील. 

तुमची जागा आरक्षित करा!

आयुर्वेदिक औषधे

वातदोषामुळे उद्भवणाऱ्या पाठदुखीसाठी आयुर्वेदिक औषधे – पवनहरा चूर्ण, अश्वगंधा, वेदनांतक वटी, वेदानांतक मलम.या औषधांमुळे वाताचे संतुलन होते.पाठदुखी बरी होते.ही औषधे वैद्याच्या सल्ल्यानुसार घ्या.

प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते.त्यामुळे प्रत्येकासाठी वेगळी लक्षणे व त्यानुसार उपचाराची गरज असू शकते .म्हणून अर्हता प्राप्त नाडी वैद्याकडून पूर्ण आयुर्वेदिक तपासणी करुन घ्या आणि पाठदुखीतून मुक्त होण्यासाठी तुम्हाला योग्य असलेली उपाययोजना अमलात आणा.

डॉ श्वेता कोठारी , श्री श्री तत्व, नाडी वैद्य यांनी दिलेल्या माहितीनुसार

लेखन – प्रतिभा शर्मा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *