वृद्धापकाळ बऱ्याच आरोग्य विषयक समस्या निर्माण करते, जसे की पाठदुखी. तथापि, ७०% रूग्णात पाठदुखीचे मुळ कारण हे बसण्याची चुकीची पद्धत, आळशी जीवनशैली, किंवा भावनिक समस्या हेच असते. लोक क्वचितच पाठदुखीच्या कारणांचा शोध घेतात आणि बऱ्याच वेळा ही समस्या तशीच, उपचार न घेता सहन करत असतात. जरी वाढलेल्या वयामुळे वेदना व्यवस्थापनाचे कठीण वेळापत्रक पाळणे शक्य नसले तरी काही सोप्या उपायांद्वारे सततच्या वेदना कमी केल्या जाऊ शकतात. आपण वेदना क्षमनाच्या काही पद्धती शिकणार आहोत. प्रत्येक पद्धत ही वेळ घेणारी आहे आणि आपण ती किती काटेकोरपणे पाळता यावर तिचा प्रभावीपणा अवलंबुन आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

पाठदुखीची कारणे

  1. शारिरीक कारणे
  2. भावनिक कारणे

शारिरीक कारणांमध्ये काही शरीर संरचनात्मक कारणांचा समावेश होतो. जसे की मणक्यांची झिज, पाठीच्या कण्याची इजा, किंवा हाडे ठिसुळ होणे ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis) ज्यामुळे पाठीच्या कण्याशी संबंधीत नसांवर ताण पडतो. जर या कारणांच्यामुळे पाठदुखी उद्भवली असेल तर वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घेणे चांगले आहे.

बऱ्याच रुग्णांमध्ये पाठदुखी ही, विचित्रपणे भावनिक कारणांच्यामुळे सुरू होते जसे ताणतणाव, भावनिक असंतुलन, आणि उतरत्या वयातील समस्या (सेवानिवृत्ती, जवळच्या व्यक्तीचा मृत्यु, आजारपण, किंवा राहणीमाणातील बदल).

पाठदुखी कमी करण्याचे उपाय

  1. योग, प्राणायम, आणि ध्यान

    हलकी योगासने आणि शरीराला ताण देणारे व्यायाम कोणत्याही वयाच्या व्यक्तीस पाठदुखी पासुन बराच आराम देतात. भुजंगासन, मांजरासन, सेतुबंधासन, अर्धचंद्रासन, बसून पाठीमागे झुकणे, मान आणि छातीला ताणणे, आणि पाठीच्या मणक्याला पीळ देणे यासारखे योग योगाभ्यास वयोवृद्ध लोक करु शकतात. हे योगाभ्यास पाठीचे स्नायु सैल करतात, संतुलन आणि लवचिकता वाढवतात.

    प्राणायाम किंवा श्वास नियंत्रीत करणारे सराव केल्याने सुद्धा पाठदुखी कमी होते. उज्जयी प्राणायाम आपली ऊर्जा वाढवते आणि रक्ताभीसरण वाढवण्यास मदत करते ज्यामुळे आपल्या स्नायुमध्ये प्राणवायु वाढतो आणि ते सैल होतात. दीर्घ प्राणायाम आणि ध्यानामुळे लोकांची तीव्र पाठदुखी कमी होण्यास मदत होते हे अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. ध्यानामुळे सजगता वाढते आणि व्यक्तिचे लक्ष दुखण्याकडे न जाता चांगल्या आठवणी कडे जाते आणि ते दुखणे विसरून जातात.

  2. पर्यायी उपचार

    मेरू चिकीत्सा, मर्मा चिकीत्सा, एक्यूपंक्चर, पंचकर्म चिकित्सा, मसाज चिकित्सा आणि फिजीओथेरेपी सारख्या उपचार पद्धती दुखणे कमी करण्यास मदत करतात. मेरू आणि मर्म या स्पर्श चिकीत्सेद्वारे शरीरातील अडथळे मोकळे होतात, तर पंचकर्म चिकित्सेमध्ये आयुर्वेदीक औषधे शरीरातील प्रकृती दोष संतुलीत करून शरीरातील ऊर्जा व प्राणवायु वाढवतात.

  3. जीवनशैली मधील बदल

    वाढते वय गती कमी करते, पण सतत कामात मग्न राहणे, हे सक्रिय जीवनाचे गुपीत आहे. सुदृढ जीवनशैली, ज्यात पाठदुखी करीता हलके व्यायाम, आणि सतत आनंदी रहाणे यांना प्राधान्य क्रम असावा. आहारा विषयी जागरूक रहा. कारण चुकीचा आहार पाठदुखीला आमंत्रण देतो (कोरटीसोल स्तर वाढणे, पचनक्रिया मंदावणे, छातीत दुखणे इ. चुकीच्या आहारामुळे उद्भवतात). कॅलशियम आणि जीवनसत्वे यांचा आहारात सामावेश केल्याने हाडाची घनता सुधारते. सिगारेट आणि दारू सारख्या व्यसनांपासून दूर रहा. पोहणे, चालणे, आणि सायकल चालवणे या सारखे आनंद देणारे व्यायाम शरिरातील मुख्य स्नायु मजबूत करतात आणि पाठदुखी सारखे आजार होत नाहीत. हे सगळे व्यायाम आठवड्यातुन कमीत कमी ३-४ तास नियमीत करणे गरजेचे आहे.

  4. जागरूकता

    बरेच वेळा आपण आयुष्य फक्त नावापुरते जगत असतो. जीवना विषयीची जागरूकता, भूतकाळ किंवा भविष्याची चिंता विसरून वर्तमान क्षणाचा आनंद घेण्यास मदत करते. कारण चिंता आणि तणाव पाठदुखीस कारणीभूत असतात, तर जागरूकता आपल्याला यापासुन दूर ठेवते. नियंत्रीत ध्यान, मंत्र ध्यान आणि सामुहिक ध्यान केल्याने जागरूकता वाढते. सतत जागरूक रहाण्याने शरीराची ठेवण सुधारते.

    श्वास हे निसर्गाने आपल्याला दिलेले सर्वात मोठे गुपीत आहे. श्वास हा आपल्या भावनांशी जोडलेला असतो. प्राणायमाद्वारे आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवता येते. म्हणून नियमीत प्राणायाम करणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपले मन आपल्या ताब्यात राहील.

    गुरूदेव श्री श्री रवि शंकर

  5. पाठदुखी पासून आरामासाठी काही उपाय

    गरम पाण्याने अंघोळ केल्यास पाठीचे स्नायु सैल होण्यास मदत होते. तर दुखणारे स्नायु आणि स्नायुंची ऊबळ बर्फाचा शेक दिल्याने शांत होते. शरीरावर अत्याधिक ताण निर्माण करणारे व्यायाम टाळावे. पुरेसा आराम आणि आधारासाठी कमरेचा पट्टा (चालणे किंवा उभे रहाताना), योग्य गादी (झोपताना), किंवा ऊशी (बसताना) पाठीला आधार देते. न घसरणारी पादत्राणे वापरल्याने घसरून पडण्याची शक्यता कमी होते. पाय अडकून पडण्याची शक्यता असणाऱ्या गोष्टी तत्काळ बाजूला करा, जसे घरातील खुल्या तारा, वर खाली असलेल्या पायऱ्या, जुने अडगळीचे सामान इत्यादी.

वय फक्त संख्या आहे

सहा वर्षां पेक्षा जास्त वाढलेलं सरासरी आयुर्मान आणि शारीरीक व्याधीवर तांत्रिक प्रगती द्वारे केले जाणारे उपचार यामुळे वय नगण्य बाब आहे. सातत्यपूर्ण सुदृढ जीवनशैली अंगिकारल्यामुळे वरदान असलेल्या मनुष्य जीवनात कोणतीही त्रासदायक स्थिती निर्माण होणार नाही, अगदी पाठदुखी सुद्धा नाही.

जीवनात फार गंभीर असण्यासारखे काही नाही, आयुष्य हा खेळण्यासाठी आपल्या हातात एक चेंडू आहे, चेंडू धरून राहू नका.

– गुरूदेव श्री श्री रवि शंकर

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *