आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील धारावी येथे आर्ट ऑफ लिव्हिंगची श्री श्री विद्या मंदिर ही सर्वात पहिली इंग्रजी माध्यम शाळा आहे – आज त्या शाळेत २२० हून अधिक मुले शिकत आहेत आणि इयत्ता सहावी पर्यंत त्यांचे वर्ग आहेत.
येथे मुलांची बिकट परिस्थिती, जागा उपलब्ध नसणे आणि शिक्षणाप्रती पालकांची उदासीनता यासारखे अनेक अडथळे असूनही आर्ट ऑफ लिव्हिंगने कित्येक वंचित मुलांपर्यंत यशस्वीरित्या पोहोचून त्यांना औपचारिक आणि सर्वांगीण शिक्षण प्रदान केले आहे.
मानसिक आणि शारीरिक अत्याचारापासून दिलासा
बहुतेक मुलांचे मानसिक किंवा शारीरिक शोषण झाले आहे, जुगार किंवा अंमली पदार्थांचे सेवन यात सहभाग आणि टोकाच्या परिस्थितीत शस्त्रे वापरणे असा त्यांचा गत इतिहास आहे. याबाबतीत श्री श्री विद्या मंदिर शाळा केवळ औपचारिक शिक्षणच देत नाही तर सोबत मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा मूलभूत पायाही विकसित करते. या शाळेत अतिरिक्त प्रशिक्षण कार्यशाळा तसेच मोफत असलेली सर्वसमावेशक आरोग्य तपासणीची वार्षिक वैद्यकीय शिबिरे आयोजित केली जातात.
शिक्षक आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे समर्पित स्वयंसेवक मुलांना मदत करण्यासाठी आणि त्यांना रोजच्या आव्हानांवर मात करण्यास सक्षम करण्यासाठी योग आणि ध्यान शिबिरांसह नियमित समुपदेशन सत्रे आयोजित करतात.
शिकणारी पहिलीच पिढी
शाळेला भेडसावणारे एक प्रमुख आव्हान म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत असलेली पालकांची उदासीन वृत्ती. मुले शाळेत टिकून राहिली पाहिजेत म्हणून आपण मुलांना आणि त्यांच्या पालकांना कसे प्रोत्साहित करू शकतो? हे साध्य करण्यासाठी, शाळेकडून पालकांसाठी विशेष समुपदेशन सत्रे आणि नियमितपणे पालक व शिक्षकांच्या बैठका आयोजित केल्या जातात. वैद्यकीय शिबिरे आणि वार्षिक कार्यक्रमासारख्या शाळेच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पालकांनाही प्रोत्साहित केले जाते. यामुळे त्यांना मुलाच्या विकासाचा एक भाग होण्याची संधी लाभते. तसे बघता, आमचे अनेक विद्यार्थी शाळेत जाणारे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच विद्यार्थी आहेत.
राहुलची गोष्ट
राहुलची आई आम्हाला सांगते की त्याच्या वडीलांना दारूचे व्यसन आहे. घरी कमावणारी ती एकटीच आहे आणि ती रोज सकाळी ८ ते रात्री १०:३० पर्यंत काम करते. साहजिकच राहुल विस्कटलेल्या अवतारात शाळेत यायचा आणि त्याचे लक्ष थाऱ्यावर नसायचे. आम्ही त्याचे नीट संगोपन केले. परीक्षा सुरू झाल्यावर आर्ट ऑफ लिव्हिंगचा स्वयंसेवक त्याच्यासोबत बसायचा आणि त्याला परीक्षेची तयारी करण्यास मदत करायचा. कारण आम्हाला माहित होते की राहुल शिकण्यात चांगला आहे. या वैयक्तिक लक्ष देण्यामुळे मदत झाली आणि राहुलने परीक्षेत चमकदार कामगिरी केली.
आमचे शैक्षणिक उपक्रम वचनबद्ध स्वयंसेवकांच्या माध्यमातून चालवले जातात, जे एक शक्तिशाली श्वास तंत्र असलेल्या सुदर्शन क्रियेपासून आपली प्रेरणा आणि ऊर्जा घेतात. तुम्ही अगदी घरी बसून हे तंत्र शिकू शकता.
त्यासाठी नोंदणी करा.
हे प्रोत्साहन मिळाल्याने तो आता स्वतःची पूर्ण जबाबदारी घेतो. त्याला शाळेत येण्याचा अभिमान वाटतो. त्याची आई सांगते की तो स्वतःच उठतो आणि पहाटे ५ वाजताच शाळेसाठी तयार होतो! जेव्हा कधी ती त्याच्या शाळेला भेट देते, तेव्हा तिचे डोळे कृतज्ञतेने भरून येतात.
शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी करवीर सांगतात, “प्रत्येकच दिवस हा एक आव्हान आणि चमत्कार असतो. शाळेच्या सर्व गरजा कशा पूर्ण होतात याचे मला आश्चर्यच वाटते. लोक इथे येतात आणि शाळेला जे काही आवश्यक असते, ते स्वेच्छेने योगदान देतात. आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम ते द्यायचे आहे. आम्हाला ते फक्त साक्षर व्हायला नको तर परिपूर्ण व्यक्ती म्हणून हवे आहेत. आम्ही वेगळी व्यावसायिक प्रशिक्षण शाळा आणि ग्रंथालय करण्याचा विचार करत आहोत. त्यांना आता शाळेत यायला आवडते किंबहुना आम्हाला कधीकधी त्यांना घरी परत जाण्यास भाग पाडावे लागते!”
समुदायाचा विकास
आमच्या शाळेचे अस्तित्व आणि त्यातल्या उपक्रमांनी संपूर्ण धारावी वासियांना बळकट करण्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्वयंसेवक समाजात शांतता आणि एकोपा आणण्याच्या उद्देशाने प्रौढांसाठी शाळेच्या परिसरात व्यसनमुक्ती शिबिरे, जनजागृती मोहीम, तणाव निर्मूलनाच्या कार्यशाळा आणि युवा नेतृत्व व प्रशिक्षण शिबिर आयोजित करतात.
आमच्या कार्यक्रमांनी प्रेरित होऊन, धारावीच्या रहिवाशांनी सुमारे ४००० चौ.फू. जमीन ज्याचा वापर डंपिंग ग्राउंड म्हणून केला जात होता, त्याचे रूपांतर बागेत करण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. हे आता धारावीतील हिरवळीच्या दुर्मिळ ठिकाणांपैकी एक आहे.
मुंबईतील वंचित भागातील मुलांसाठी असलेल्या शाळेची क्षमता केवळ मुलांचे जीवन सुधारण्यासाठीच नाही तर प्रौढांवर आणि आसपासच्या समाज बांधवांवर कशी सकारात्मक परिणाम करणारी ठरते हे पाहणे आनंददायी ठरेल.
धारावी शाळेबद्दल अधिक वाचण्यासाठी. योगदान देण्यासाठी येथे क्लिक करा.