वेद विज्ञान महा विद्यापीठ (व्ही व्ही एम व्ही पी) मध्ये ४७३ शाळां आहेत ज्या शाळा ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षण क्रांती घडवत आहेत. पहिली ग्रामीण शाळा १९८१ साली गुरुदेव श्री श्री रविशंकरजींनी सुरु केली. या सगळ्याची सुरुवात झाली जेंव्हा गुरुदेवांनी आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर जवळ काही स्थानिक मुलांना मातीत खेळताना पाहिले. जेंव्हा त्यांनी पाहिले की त्या मुलांकडे शिक्षणाच्या संधीचा अभाव आहे, तेंव्हा त्यांनी या मुलांना सहकार्य करायचा निश्चय केला.
या मुलांची काळजी घेण्यासाठी, त्यांना स्वच्छतेबद्दल, मूलभूत गोष्टी शिकवण्यासाठी, त्यांच्यासोबत शैक्षणिक खेळ खेळण्यासाठी आणि त्यांना मोफत पौष्टिक जेवण पुरवण्यासाठी एक स्थानिक स्वयंसेवक नेमण्यात आला. मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी हे एक मोठे आकर्षण ठरले, आणि आजही आहे. जसजशी शाळा वाढत गेली तसतशी एक औपचारिक शैक्षणिक रचना तयार झाली आणि विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या वाढत गेली. आमच्या मोफत शाळांबद्दल अधिक जाणून घ्या.

पहिल्या पिढीतील विद्यार्थी

आमचे जवळपास ९५% विद्यार्थी त्यांच्या कुटुंबातील शाळेत जाणारे पहिलेच आहेत. आमच्या शाळांना स्थानिक परीक्षांमध्ये १००% यश मिळाल्याचा अभिमान वाटतो.

ह्या लहान वयात माझी मुलगी कदाचित शेतात काम करत असती. तिला शिक्षण मिळेल असे आम्हाला कधीच स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं ! तिला शाळेत जाताना पाहून मला खूप आनंद झाला!

सौ सावित्री, आमच्या मोफत शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचे एक पालक.

मोफत शिक्षण

शाळेतील त्यांच्या उपस्थितीतील सर्व अडथळे दूर करण्यासाठी, विद्यार्थ्यांना गणवेश, बूट, पुस्तके, लेखन साहित्य, बस सेवा आणि दुपारचे जेवण मोफत दिले जाते. 

बाहेर वैद्यकीय सुविधा आणि फिरता दवाखानाही उपलब्ध करून दिला आहे.

पूर्ण शिक्षण

निरोगी शरीर आणि मन प्राप्त करण्यासाठी, योगा, ध्यान, क्रीडा आणि सर्जनशील गोष्टी, उदा. नृत्य, गायन, रेखाचित्र आणि चित्रकला हे शाळेच्या अभ्यासक्रमातील एक अविभाज्य घटक बनलंले आहेत.

विद्यार्थ्यांना घरातील कोणत्याही नकारात्मक प्रभाव हाताळण्यास मदत करण्याकरिता, लहान मुलांसाठी “आर्ट एक्सेल ” नावाचा प्रोग्रॅम नियमितपणे आयोजित केला जातो.

नेतृत्त्व कौशल्य विकसित करणे

शाळेचे स्वतःचे मंत्रीमंडळ आहे, जे विद्यार्थी स्वतः निवडतात, जेणेकरून त्यांना राजकीय व्यवस्थेची समज येईल आणि त्यांच्यातील नेतृत्त्व कौशल्याला वाव मिळेल. भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेचे मूल्य या व्यवस्थेतून मुले शिकतात. शालेय मंत्रीमंडळ कनिष्ठ वर्गांची जबाबदारी घेतात आणि शालेय प्रशासनाला सहकार्य करतात.

व्यावसायिक प्रशिक्षण

व्यावसायिक कौशल्य उदा. शिलाई काम, संगणक प्रशिक्षण आणि सुतारकाम मोठ्या वयोगटातील विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांना माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहन देतात.

गुंतवून ठेवणारा समुदाय

आम्ही नियमित माजी विद्यार्थ्यांच्या बैठक आयोजित करतो, जिथे माजी विद्यार्थी, वर्तमान विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देतात. हे माजी विद्यार्थी आपले अनुभव सर्वांना सांगतात शेअर करतात आणि विद्यार्थ्यांना माध्यमिक शिक्षण प्राप्त करण्यात आणि आपल्या ध्येयाचा पाठपुरवठा करण्यास प्रोत्साहित करतात.

आपण हे कसं करावे

आमचे शैक्षणिक उपक्रम स्वयंसेवकांच्या एका वचनबद्ध संघाद्वारे चालवले जातात जे प्रभावी श्वसन प्रक्रिया – सुदर्शन क्रिया मधून त्यांची प्रेरणा आणि ऊर्जा घेतात. आपल्या घरच्या आरामशीर वायावरणात हे शिका. आजच नोंदणी करा

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *