शेकडो वर्षांपासून विविध संस्कृती आणि सभ्यता सूर्याची उपासना करत आले आहेत – जो जीवन आणि उर्जेचा एकमात्र स्त्रोत आहे. यापैकी एक आहे सूर्य नमस्कार, जो योगासनांचा विशिष्ट क्रम आहे. निरोगी जीवनासाठी सूर्य नमस्काराचे काय महत्व आणि लाभ आहेत ते जाणून घेऊया.

सूर्य नमस्कारचे लाभ (Surya Namskarache Fayade)

  • वजन घटण्यास मदत होते
  • आपण निरोगी राहण्यास मदत होते
  • पचन क्रिया सुधारते
  • हृदय बळकट होते
  • त्वचेची आणि केसांची निगा राखण्यात मदत होते
  • तणाव नाहीसा करून अंतर्ज्ञान वाढते
  • शरीर आणि मन संतुलित होते
  • नैसर्गिक रीतीने निद्रानाश बरा करण्यास मदत होते
  • आपणास रोगमुक्त आणि निरोगी ठेवण्यास मदत होते
  • शांत बनवते आणि ऊर्जा केंद्रांना चालना देते 
  • शरीर, श्वास आणि मन यांच्यामधील परस्पर संबंधामध्ये नियंत्रण प्राप्त होते
  • पोटाचे स्नायू, श्वसन संस्था, लसिका संस्था, मणक्यातील मज्जा तंतू आणि इतर अंतर्गत अवयव उत्तेजित होतात
  • पाठीचा मणका, गळा, खांदे, हात, मनगट, पाठ आणि पायाचे स्नायू बळकट बनतात ज्यामुळे एकंदर लवचिकता वाढते

चला सूर्यनमस्काराचे आणखी काही लाभ सविस्तर पाहू.

सूर्यनमस्काराने वजन घटते

  • हा सर्व शरीरावर परिणाम करणारा गहन असा शारीरिक व्यायाम प्रकार आहे. आपण याच्या फेऱ्यांची संख्या वाढवाल तसे वजन कमी होत असल्याचे आढळेल. यातील झुकणे आणि ताणामुळे चंचलता कमी होण्यास मदत होताना जाणवेल.

केस गळणे थांबवते

  • सूर्य नमस्कारामुळे टाळूमधील रक्त संचारात वाढ होते, परिणामतः केस गळती रोखली जाते. वाढलेल्या रक्त संचारामुळे मस्तकाचे पोषण होऊन केस गळती रोखली जाते.विविध आसनांमुळे केस सफेद होणे रोखते.

त्वचेची चमक वाढवते

  • सूर्य नमस्कारामुळे शरीरातील सर्व अवयवांमधील रक्त संचार वाढतो, त्यामुळे त्वचा तरूण राहते. त्यामुळे ऊर्जा आणि चैतन्य वाढते, जेणेकरून चेहरा चमकदार, तेजस्वी बनतो. यामुळे त्वचेचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते.
  • सूर्य नमस्कारामुळे शरीर आणि मनाचा तणाव दूर करून सुरकुत्या येण्यास प्रतिबंध होतो

अधिक अंतर्ज्ञानी होतो

नियमित केलेल्या सूर्य नमस्कार आणि ध्यान यांच्या मदतीने बदामाच्या आकाराच्या मणिपूर चक्राची वाढ होऊन ते तळहाताएवढे बनते. मणिपूर चक्राच्या या प्रसरणामुळे आपल्यातील अंतर्ज्ञान क्षमता वाढून आपण अधिक एकाग्रचित्त होतो. तर मणिपूर चक्राच्या आकुंचणामुळे नैराश्य येऊन इतर नकारात्मक भावना वाढतात.

मुलांना सूर्य नमस्काराचे लाभ

सर्वत्र असणाऱ्या तीव्र स्पर्धेमुळे मुले लहानपणापासून ताण तणाव आणि नैराश्याचे शिकार बनतात. मुलांना सूर्य नमस्काराची मदत मन शांत ठेवण्यासाठी होते, एकाग्रता वाढते आणि सहनशक्ती निर्माण होते. खास करून परीक्षेच्या वेळचे नैराश्य आणि चंचलता कमी होते. नियमित सूर्य नमस्कार करण्याने शारीरिक सामर्थ्य आणि चैतन्य प्राप्त होते. यामुळे स्नायू मजबूत बनतात आणि शरीराची लवचिकता वाढते. पांच वर्षाची मुले देखील दैनंदिन सूर्य नमस्कार करू शकतात.

महिलांना सूर्य नमस्काराचे लाभ

आरोग्याबाबतीत सजग असणाऱ्यांसाठी सूर्य नमस्कार एक वरदान आहे. सूर्य नमस्कारातील काही आसने पोटाभोवतीची अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात आणि आपणास नैसर्गिकरित्या योग्य सुडौल ठेवतात. काही आसनांमुळे थॉयरॉईड सारख्या सुप्तावस्थेतील ग्रंथी उद्दिपित होऊन संप्रेरकांच्या स्त्रवण्यास प्रवृत्त ठेवतात. सूर्य नमस्काराच्या नियमित सरावामुळे स्त्रियामधील अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते आणि अपत्य प्राप्तीसाठी सहाय्यक होते. शिवाय चेहऱ्यावरील चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.  

योगासने शरीर आणि मन यांच्या विकासासाठी मदत करत असली तरी ते औषधांना पर्याय नाहीत. तज्ञ योग प्रशिक्षकाच्या निरीक्षणाखाली योग शिकणे आणि करणे आवश्यक आहे. कोणत्याही आरोग्याच्या तक्रारीसाठी आपले डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षक यांच्या सल्ल्याने योगासने करावीत.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *