नाडीशोधन प्राणायाम म्हणजे काय
नाडी = सूक्ष्म ऊर्जा वाहिनी; शोधन = शुद्ध करणे; प्राणायाम = श्वसन प्रक्रिया
नाड्या ह्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या आहेत, ज्या विविध कारणांमुळे बंद होऊ शकतात. नाडी शोधन प्राणायाम ही एक श्वसनाची प्रक्रिया आहे, ज्यामुळे बंद झालेल्या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या खुल्या होऊन मन शांत होते. या प्रक्रियेला अनुलोम विलोम प्राणायाम असे सुद्धा म्हणतात.
नाड्या कशामुळे बंद होतात
- तणावामुळे नाड्या बंद होऊ शकतात
- शरीरातील विषारी द्रव्यांमुळे सुद्धा नाड्या बंद होऊ शकतात
- शारीरिक आणि मानसिक आघातामुळे सुद्धा नाड्या बंद होऊ शकतात.
- अस्वास्थ्यकर जीवनशैली
बंद नाड्यांचा परिणाम
इडा, पिंगला आणि सुषुम्ना या शरीरातील तीन महत्त्वाच्या नाड्या आहेत. जेव्हा इडा नाडी नीट कार्य करीत नाही किंवा बंद असते तेव्हा सर्दी, नैराश्य, मानसिक ऊर्जा कमी होणे, पचन मंदावणे, डावी नाकपुडी बंद असणे या गोष्टी अनुभवास येतात. आणि जेव्हा पिंगला नाडी नीट कार्य करीत नाही किंवा बंद असते तेव्हा उष्णता, पटकन राग येणे, चिडचिड होणे, खाज येणे, शुष्क त्वचा आणि घसा, जास्त भूक लागणे, जास्त शारीरिक आणि लैंगिक ऊर्जा व बंद उजवी नाकपुडी या गोष्टी अनुभवास येतात.
नाडी शोधन प्राणायाम करण्यासाठी तीन कारणे
- नाडीशोधन प्राणायामामुळे मन शांत होऊन ध्यानात प्रवेश करण्यासाठी तयार होते.
- याचा दररोज काही मिनिटे सराव केल्याने मन शांत आणि प्रसन्न रहाते.
- यामुळे जमा झालेला तणाव आणि थकवा दूर होण्यास मदत होते.
नाडीशोधन प्राणायाम कसा करावा
- आरामशीर बसा, पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे शिथिल करा, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा.
- डावा हात गुडघ्यावर ठेवा, तळहात आकाशाकडे किंवा चिन मुद्रेमध्ये (अंगठा आणि तर्जनी च्या अग्रभागाचा एकमेकांना हलका स्पर्श) ठेवा.
- उजव्या हाताची तर्जनी आणि मध्यमा यांचा अग्रभाग भ्रूमध्यावर (दोन्ही भुवयांच्या मध्ये) ठेवा, करंगळी आणि अनामिका डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडी वर ठेवा. आपण करंगळी आणि अनामिकेचा उपयोग डावी नाकपुडी उघड आणि बंद करण्याकरता तसेच अंगठ्याचा वापर उजवी नागपुडी उघड आणि बंद करण्याकरता करणार आहोत.
- अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने हळुवारपणे श्वास बाहेर सोडा.
- आता डाव्या नाकपुडीने श्वास भरा, करंगळी आणि अनामिकेने हळुवारपणे डावी नाकपुडी बंद करा, उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढा आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडा.
- उजव्या नाकपुडीने श्वास भरा व डाव्या नाकपुडीने सोडा. अशाप्रकारे तुम्ही नाडीशोधन प्राणायामाचे एक चक्र पूर्ण केले आहे. आळीपाळीने एकेका नाकपुडीने श्वास घेणे व सोडणे चालू ठेवा.
- अशाप्रकारे आळीपाळीने दोन्ही नाकपुड्यामधून श्वास घेऊन ९ चक्रे पुर्ण करा. प्रत्येकवेळी श्वास सोडल्यावर त्याच नाकपुडीने श्वास घेण्याचे लक्षात ठेवा. प्राणायाम करताना पूर्ण वेळ डोळे बंद ठेवा आणि कोणताही जोर न लावता किंवा विशेष प्रयत्न न करता लांब, खोल आणि सहज श्वास चालू ठेवा.
नाडीशोधन प्राणायाम करताना खालील गोष्टींची काळजी घ्या.
- श्वासाचा प्रवाह हळुवार आणि नैसर्गिक ठेवा, श्वासावर जोर देऊ नका. तोंडाने श्वासोच्छवास करू नका किंवा श्वासोच्छवास करताना कुठलाही आवाज करू नका
- उज्जयी श्वास घेऊ नका
- कपाळावर आणि नाकावर बोट ठेवताना ती हळुवारपणे ठेवा, जोर देण्याची गरज नाही.
- नाडी शोधन प्राणायामाचा सराव केल्यानंतर जर तुम्हाला निरुत्साही वाटत असेल आणि जांभया देत असाल तर श्वास घेताना आणि सोडताना लागणाऱ्या वेळेवर लक्ष द्या. श्वास सोडायला लागणारा वेळ श्वास घ्यायला लागणाऱ्या वेळेपेक्षा जास्त असायला हवा.
सूचना
- नाडीशोधन प्राणायाम केल्यानंतर थोडा वेळ ध्यान करणे चांगले आहे.
- नाडीशोधन प्राणायामाचा समावेश पद्म साधनेतील क्रमात करू शकता.
नाडीशोधन प्राणायामाचे फायदे
- मन शांत आणि स्थिर करण्यासाठी अतिशय उत्तम असे श्वासाचे तंत्र.
- भूतकाळातील गोष्टींबद्दल पश्चाताप किंवा गौरव आणि भविष्यकाळाबद्दलची चिंता करणे ही मनाची प्रवृत्ती आहे. नाडीशोधन प्राणायामामुळे मनाला वर्तमान काळात आणण्यास मदत होते.
- बऱ्याचशा अभिसरण आणि श्वसनाच्या समस्यांवर उपचारात्मक काम करते.
- शरीरात आणि मनामध्ये जमा झालेला ताण प्रभावीपणे दूर करून विश्राम करण्यास मदत होते
- मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागात सुसंवाद निर्माण होण्यास मदत होते, जे आपल्या व्यक्तिमत्वाच्या तार्किक आणि भावनिक बाजूंशी निगडित आहे.
- नाडी ( सूक्ष्म ऊर्जा वाहिनी ) शुद्ध आणि संतुलित करण्यास मदत करते, त्यामुळे शरीरात प्राणशक्तीचा प्रवाह सहजपणे होतो.
- शरीराचे तापमान संतुलित ठेवते.
विसंगती
काहीही नाही. तुमच्या श्री श्री योग प्रशिक्षकाकडून हा प्राणायाम शिकल्यावर तुम्ही दिवसातून २-३ वेळा रिकाम्या पोटी याचा सराव करू शकता.
योगसाधना शरीर आणि मन यांच्या विकासात अनेक आरोग्यदायी फायदे करून देते, पण औषधांना पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग शिक्षकाच्या देखरेखेखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. काही आजार असल्यास योग आसनांचा सराव डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षक यांच्या सल्यानेच करावा. श्री श्री योगासाठी तुमच्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग केंद्राशी संपर्क करा.
नाडीशोधन प्राणायाम संबंधित नेहमी विचारले जाणारे प्रश्न
नाडी शोधन म्हणजे शुद्धीकरणाचा सराव.