पहिले मत हे चिरकाल टिकणारे असते. आणि हे पहिले मत बनण्यासाठी आपल्याकडे एकच संधी असते. बहुतांशी वेळा लोक आपला चेहराच पहिल्यांदा पाहतात. हसरा चेहरा मूड हलका फुलका करतो, लोकांना हवा हवासा वाटतो आणि त्यांना सहज बनवतो. एका प्रसिद्ध सर्वेक्षणातून असे माहित झाले आहे की एक लहान मुल दिवसातून ४०० वेळा हसते तर प्रौढ व्यक्ती फक्त ८ वेळा हसते.

निःशंकपणे प्रौढांच्या चेहऱ्यावरील चमक आणि हास्य जाण्यामागे तणाव हेच प्राथमिक कारण आहे. त्यामुळे अकाली वृद्धत्व, मंदपणा आणि थकवा चेहऱ्यावर दिसू लागतो. तथापि या तणावातून बाहेर पडण्याचा योग हाच उत्तम मार्ग आहे. योग थकलेला चेहरा ताजातवाना करण्यास मदत करतो.

चेहऱ्यासाठी कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे आणि तणावाच्या संचयामुळे आपल्या चेहऱ्यातील स्नायूंमध्ये तणाव निर्माण होतो. सूक्ष्म योग नांवाच्या योग प्रक्रियेमुळे हा तणाव मुक्त होण्यास मदत होते. अगदी कमी वेळेच्या, साध्या सुलभ आणि अत्यंत सूक्ष्म योग प्रक्रियेमुळे आपल्या चेहऱ्यावर चमत्कारिक परिणाम होतो. चेहऱ्याच्या या योग प्रक्रियेमुळे अगदी काही मिनिटात चेहरा चमकू शकतो. चेहऱ्यावरील स्नायू आणि मज्जा सांधे ताणले जाऊन विश्राम पावतात, त्यामुळे सुरकुत्या उशिरा येतात. चेहऱ्यावर तजेला निर्माण होण्यासाठी सूक्ष्म व्यायाम एक उत्कृष्ट मार्ग आहे. 

https://youtu.be/krYQBpGl4rQ

मग, चेहऱ्यासाठी काही सुलभ आणि परिणामकारक योग करण्यास तयार होऊया.

पिकबू! डोळ्यांसाठी मसाज

हाताचा अंगठा बाहेर ठेऊन मुठी बंद करा. आत्ता आपले डोळे बंद करूया. हळूवारपणे आपला उजवा अंगठा उजव्या डोळ्यावरून, डावा अंगठा डाव्या डोळ्यावरून फिरवत रहा. अंगठ्याने डोळ्यावर अलगद दाब देत अंगठा गोलाकार फिरवत रहा. हा व्यायाम २ ते ३ मिनिटे करा.

हे कसे काम करते?

यामुळे डोळ्या सभोवतीचा तणाव मुक्त होऊन डोळ्याखालील काळ्या वर्तुळांपासून सुटका होईल.

आश्चर्यचकीत व्हा! डोळ्याची उघड झाप करण्याचा व्यायाम

डोळे मोठे करा, डोळ्यातील पांढरा भाग शक्य तेवढा मोठा करा. मग, डोळे घट्ट मिटा. मोठे उघडा, घट्ट मिटा. जलद गतीने डोळ्यात पाणी येईपर्यंत असे करा. आता डोळे मिटा आणि आराम करा. डोळ्यांचा हा व्यायाम ३ ते ४ मिनिटे करा.

हे कसे काम करते?

आपल्या डोळ्याभोवतीचे स्नायू आणि कपाळ यांचा आपण व्यायाम करता. चेहऱ्याच्या या व्यायामामुळे आपली दृष्टी सुधारते. यामुळे कालांतराने आपली चष्म्याची गरज कमी होऊ शकते.

गोबरे गाल! गालांचा व्यायाम

तोंडाने श्वास घेऊन काही सेकंदासाठी दोन्ही गाल फुगवून ठेवा. आत्ता तोंडानेच श्वास सोडा, असे ८ ते १० वेळा करा. फुंकायची वाद्ये वाजवणाऱ्यांना कसे वाटते, हे आपणास कळेल.

हे कसे काम करते?

या व्यायामामुळे आपल्या चेहऱ्यावर तजेला निर्माण होईल. यामुळे आपल्या गालाचे स्नायू मजबूत बनतील आणि ते  पातळ आणि पोकळ होणार नाहीत.

सॅक्सोफोन सारखी फुंकायचे वाद्ये वाजवणाऱ्यांचे गाल मजबूत हवे असतात. अश्या चेहऱ्याच्या स्नायूचा व्यायाम केल्याने आपल्या दिसण्यात बदल घडतो. म्हणून तजेलदार आणि गुबगुबीत गालासाठी गालांचा हा व्यायाम करा.

मुका घ्या! तोंडाचा व्यायाम

हास्य मोठे करून आपले तोंड शक्य तेवढे पसरा. आत्ता ओठ एकत्र घट्ट आवळून मुका घ्या! हा व्यायाम २० ते २५ वेळा करा.

हे कसे काम करते?

चेहऱ्याच्या या व्यायामामुळे ओठ आणि गालाभोवतीच्या स्नायूंना आराम मिळतो आणि आपला चेहरा उजळतो. आपण गुलाबी गाल आणि तजेलदार हास्याचे धनी असाल! जेंव्हा उत्साही वाटत नसेल, तेव्हा लक्षात ठेवा – जोपर्यंत तुम्ही तसे होत नाही तोपर्यंत तशी नक्कल करा. कधीतरी तुम्ही तसे बनालच!

वर पहा! हनुवटीचा व्यायाम

हाताचे अंगठे हनुवटीखाली येतील अशी हनुवटी धरा. हनुवटी खाली दाबायला सुरवात करा. अंगठ्याच्या सहाय्याने हनुवटी वर दाबा. असे २ ते ३ मिनिटे करा.

हे कसे काम करते? 

या व्यायामामुळे जाड हनुवटीपासून आपली सुटका होईल. सातत्याने ह्नुवटीच्या या व्यायामामुळे हनुवटी चांगली दिसेल.

माफी मागा! कानांचा व्यायाम

कानाच्या पाळ्या धरा आणि ३० सेकंदासाठी खाली ओढा. पुढील ३० सेकंदासाठी कानाच्या पाळ्या बाहेर खेचा. कानाच्या पाळ्या धरून घड्याळाच्या दिशेने आणि उलट दिशेने प्रत्येकी तीस सेकंद फिरवा.

हे कसे काम करते?

या व्यायामामुळे सजगता वाढते आणि चेहऱ्यावरील स्नायूमधील तणाव निघून जातो.

ओढा आणि ढकला ! भुवयांचा व्यायाम

बोटांनी भुवया अश्या प्रकारे धरा की मध्यापासून कडेपर्यंत त्या खेचता येतील. ३ ते ४ मिनिटे हे करा.

हे कसे काम करते?

चेहऱ्याच्या या व्यायामामुळे भुवयांमधील तणाव कमी होऊन भुवयांना आराम मिळतो.

चेहऱ्यासाठी योग

हे साधे सोपे व्यायाम प्रकार आपण केंव्हाही आणि कोठेही करू शकतो. याच्या सातत्याने सरावाने आपण दिवसभर ताजे तवाने रहातो. हे व्यायाम आपण मुलाखतीपूर्वी किंवा सादरीकरणापूर्वी करू शकता. आपल्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि शांती झळकेल. याचा आणखी एक फायदा आहे. चेहऱ्याच्या या योगामुळे आपले ध्यान आणखी सखोल आणि सशक्त होईल.

खऱ्या आनंदाकडे मोठी झेप घेण्यासाठी आणखी एक छोटे पाऊल आपण घेऊ शकता. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये नांव नोंदवा. यातील प्रमुख श्वसन प्रक्रिया, सुदर्शन क्रिया, नकारात्मकता आणि ताण तणाव यांच्यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. जगभरातील कोट्यावधी लोकांना याचा लाभ झाला आहे. आपल्या नजीकच्या हॅपिनेस प्रोग्रॅममध्ये सुदर्शन क्रिया शिकू शकता.

शरीर आणि मन यांना अनेक निरोगी लाभ देण्यास योग साधना मदत करत असली तरी ती औषधांना पर्याय होऊ शकत नाही. योगासने शिकणे आणि करणे हे प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करणे महत्वाचे आहे. कोणत्याही आरोग्याच्या तक्रारीसाठी आपले डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षक यांचा सल्ला घेऊन योगासने करावी.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *