नवीन वर्षाच्या योजना आखण्यासाठी मेंदूला जरा ताण देण्याची वेळ आली आहे. तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या स्वत:च्या निरोगी शरीरासाठी आणि तणावमुक्त मनासाठी योजनांचा आराखडा. नवीन वर्षाच्या तुमच्या निश्चयांच्या यादीत योगा का असावा याची सहा सुयोग्य कारणे अशी आहेत.
१. लवचिकता वाढवण्यासाठी : कळत नकळत आपण आपली दुखणारी पाठ किती वेळा चोळली आहे ? बरेचदा आपण एखादी लांबची बरणी घेण्यासाठी हात लांब करतो आणि एखादा स्नायू खेचला जातो. आपले वय होत चालले आहे कां ? उत्तर आहे ‘होय’. आजकालच्या जगात तात्पुरते उपाय, फास्ट फूड आणि वेगात गाड्या चालवणे या सर्वात आपण आपल्या परंपरागत साधना आणि वेळीच टाका घातल्याने मोठे नुकसान होण्याचे टाळते या गोष्टी विसरत चाललो आहोत. रोज सकाळी शरीराला ताण देणारे काही व्यायाम, सूर्यनमस्कार याने तुमच्या शरीराला खूपच फायदेशीर होऊ शकते. लवकरच तुमच्या हे लक्षात येईल की शरिर जास्त लवचिक झाले आहे आणि लांब असलेली बरणी हात लांब करून सहज घेता येईल !
२. तंदुरुस्त शरिर कमावण्यासाठी: जिमला जाणे, सायकल चालवणे, कंबरेचा घेर कमी करणे या गोष्टी तुमच्या यादीत असतील. या सर्व गोष्टींवर योगा हा चांगला उपाय ठरू शकतो. रोज काही मिनिटे ‘कपालभाती’ प्राणायाम केल्याने, तुमच्या कंबरेचे माप बघून तुमच्या शिंपी आश्चर्यचकित होऊ शकेल. सूर्यनमस्कार – निरनिराळ्या योगासनांचा हा संच तुमच्या शरीराच्या मुख्य स्नायूंवर काम करतो. हा संपूर्ण शरीराला व्यायाम देतो. रोज काही सूर्यनमस्कार घातल्याने तुमाला केवळ ताजेतवाने वाटेल असे नाही तर तुमचे एक दोन इंच कमी करायलाही मदत होईल.
३. तल्लख, तीक्ष्ण मन आणि निर्णय क्षमता: घाई घाईने निर्णय घेण्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. काही वेळा शांत बसून विचारपूर्वक धोरण आखावे लागते. योगासाधना तुम्हाला एक सूज्ञ आणि शांत माणूस बनवते. जास्त विचार करण्यात वेळ न घालवता, योग्यवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात येते. बंगलोर येथील व्यवस्थापन सल्लागार, श्रीनिवास उप्पालौरी म्हणतात, “योगासाधनेमुळे माझ्यात असलेले गुण आणि क्षमता यांची मला जाणीव झाली. तुमच्यातील आश्चर्यकारक गुण तुमच्यातून वाहू लागतात.”
आवर्जून वाचा :
- [402845:नैसर्गिक तजेलदार त्वचेसाठी योगा]
- [400971:मधुमेहाकरिता योग]
४. प्रिय व्यक्तींबरोबर व्यतीत करण्याचा वेळ: सतत व्हिडीओ गेम्स, सोशल मिडिया, वाढदिवसांच्या पार्ट्या यात तुमची मुले गुंतलेली असतील, तर तुमचा जोडीदार नवीनच सुरु झालेल्या मॉलमध्ये कपडे खरेदीत व्यस्त असेल. दिवस जास्त जास्तच व्यस्त होत आहेत. सगळ्या कुटुंबाला एकत्र आणण्याचे योगासाधना हे एक चागले कारण होऊ शकते. सर्वांनी मिळून योगासाधना करण्यासाठी एक वेळ ठरवून घ्या. जे कुटुंब एकत्र योगासने करते ते एकत्र रहाते ! मुलावर चांगल्या मूल्यांचा संस्कार करण्याची आणि त्याचबरोबर कुटुंबातील वयस्क व्यक्ती, जोडीदार आणि मुले सर्वाची तंदुरुस्ती राखण्याची ही उत्तम संधी आहे. निरोगी कुटुंब बघायला कोणाला आवडणार नाही ?
५. तुमच्या शरीरातील विषवत द्रव्ये काढून टाकण्यासाठी: दिर्घकाळ योगासाधना केल्याने त्याचा जास्त चांगला परिणाम होतो. सातत्याने साधना केल्यानेच त्याचा फायदा दिसून येतो. शरीरातील विषवत द्रव्यांचा पूर्णपणे निचरा होणे हा त्यातलाच एक फायदा आहे. नियमित योगासाधना केल्याने, खोलवर असलेले तणाव आणि शरीरातील विषवत द्रव्ये याचा निचरा होतो. परिणामी तरुण निरोगी शरिर, शांत मन आणि प्रसन्न व्यक्तिमत्व राहू शकते. योगासाधनेच्या द्वारे स्वत:चा नव्याने शोध घ्या.
६. सर्वांगीण आरोग्यासाठी: रक्तदाब, मधुमेह, चिंता, निद्रानाश, तणाव, कमकुवत हाडे या सर्वांवर योगासाधना हे उत्तर आहे. असे म्हणतात की ‘ नंतर इलाज करण्यापेक्षा आधीच प्रतिबंध केलेला बरा’. योगासाधना ही प्रतिबंधात्मक पायरी होऊ शकेल. आरोग्याच्या विविध समस्यांवर योगासाधना कशी उपयोगी पडू शकेल यावर बरेच संशोधन झाले आहे.
श्री श्री रविशंकर जी यांच्या प्रेरणेने
प्रणव देसाई लिखित