किशोरवयीन म्हणजे आपणास आपल्या संपूर्ण अधिकाराची खात्री असल्याचा काळ. पण जसेजसे आपले वय वाढत जाते, तसतसे आपणास खूप कमी माहिती आहे आणि आपण किती चुकीचे होतो याची खात्री होते किंवा आपणास कोणीतरी त्याची जाणीव करून देतं. पण त्या गौरवशाली किशोरवयात मात्र आपणास इतरच, विशेषतः आपले पालक नेहमी चुकीचे आहेत असे वाटत राहते.

किशोरवयीन आपल्या जीवनातील सर्वात जास्त तणावपूर्ण काळ असतो हे आपल्याला अगोदर मान्य करावे लागेल. ही मुले पालकांपासून थोडे दूर व्हायला लागतात किंवा अंतर राखायला लागतात. आतापर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत ज्यांची मदत लागत असे, अशा पालकांना ते दूर ठेवायला सुरुवात करतात आणि त्यांचे मित्र त्यांना जास्त जवळचे वाटायला लागतात. त्या मित्रांना ते प्रत्येक गोष्टीत सल्ले विचारू लागतात , मग ते फॅशन संदर्भात असो , की एखाद्या गोष्टीची योग्यता ठरवणे असो किंवा इतर सगळ्याच बाबतीत, त्यांच्यावर ते अवलंबून राहू लागतात. मग पालक आणि पाल्यातील अंतर खूप वाढत जाते. त्यांच्या जगात इतके दिवस केंद्रस्थानी असणारे पालक त्यांना अचानक खूप जुन्या काळातले, कंटाळवाणे, मागासलेले , अज्ञानी वाटू लागतात. आपण त्यांना या कठीण काळात मदत करू पाहता , पण त्यासाठी ते तयार नसतात, ते आपल्या मदतीसाठी इच्छुक नसतात. 

आणि मग ते किशोरवयीन मुल सुकाणू तुटलेल्या जहाजासारखे युवकांच्या जगात फेकले जाते. पालकांच्या अपेक्षा, त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा, मित्रांचा दबाव, शारीरिक बदल, सगळ्या गोष्टींमध्ये दुसऱ्याकडून समर्थनाची आवश्यकता भासणे या सगळ्या मध्ये त्यांचा प्रेशर कुकर होतो. तो काळ पालक आणि पाल्य दोघांसाठी पण कठीण असतो. पण काही गोष्टी पालक या नात्याने आपल्या पाल्याला मदत करण्यासाठी आपण करू शकता. जेणेकरून आपले पाल्य, आपले कुटुंब आणि आपण हा आव्हानात्मक काळ सहज पार करू शकता.

पालकांच्या अपेक्षा

शैक्षणिक दबाव कधी पालकांमुळे तर कधी मुलांच्या मुळेच वाढतो तर कधी दोन्हींचा एकत्र प्रभाव असतो. त्यांच्या समोर बोर्डाची परीक्षा, स्पर्धात्मक परीक्षा, पुढचे करिअर अशा अनेक गोष्टींचा राक्षस उभा असतो. करिअर विषयी त्यांनी काही ठरवलेले नसते. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश संपादन करण्यासाठी लक्ष केंद्रित केले तर, सामाजिक जीवना पासून ते दूर जातात. आवड असलेले तेही सर्व त्यांना या परीक्षांच्या तयारी साठी सोडून द्यावे लागते जसे की, खेळ, आर्ट्स , नृत्य आणि संगीत. 

पालक काय करू शकतात 

त्यांना सुसज्ज करा: शैक्षणिक दबाव येण्याचे सर्वात जास्त दुर्लक्षित कारण म्हणजे आपण त्यांना खूप माहिती तर देतो , मात्र त्यांची धारणाशक्ती कशी वाढेल त्यांची एकाग्रता कशी वाढेल यासाठी मात्र आपण काहीही करत नाही. त्यासाठी आपण त्यांना काही उपयोगी साधने देऊ शकता , जसे की आर्ट ऑफ लिव्हिंग च्या शिबिरामध्ये शिकवली जाणारी श्वासावर आधारित सुदर्शन क्रिया™. त्यातून त्यांची संग्राहक शक्ती आणि एकाग्रता वाढेल त्यामुळे त्यांचा मानसिक तणाव कमी होईल. अशा कठोर परीक्षांमध्ये त्यांना असेच ढकलून देणे आणि काही साधनाची उपलब्धता नसणे हे योग्य नाही. त्या अगोदर जर त्यांना अशी काही उपयुक्त साधने दिली तर , त्यांचा हा तयारीचा काळ तणावपूर्ण न राहता अधिक कार्यक्षम राहील.

जरी अपयश आले तरी त्यांच्या वरचे प्रेम कमी होऊ देऊ नका : अपयशासाठी थोडी जागा असू द्या.
महत्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये स्वाभिमान रुजवणे, सृजनशीलतेला वाव देणे आणि अपयश पण स्वीकार करण्याची तयारी करणे. त्यांच्यावर आपल्या मतांचा भडिमार करू नका. त्याऐवजी त्यांना आपले दृष्टिकोन समझावून सांगा आणि जर त्यांचा दृष्टिकोन चुकीचा असेल, तर त्यांना ते पटवून द्या. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण त्यांच्यापासून दूर जाऊ नका किंवा आपले प्रेम कमी होऊ देऊ नका. भविष्यात जेंव्हा त्यांना आपल्या प्रेमाची आणि आधाराची खात्री पटेल, तेंव्हा ते त्यांचा योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम होतील. ते त्यांच्या वर्तमान क्षणात राहू लागतील आणि त्यामुळे त्यांचे मन शांत राहील. शांत मन असणे ही एकाग्रतेची किल्ली आहे.

किशोरवयीन मुलांना वाढवणे म्हणजे एक घोडा चालविण्यासारखे आहे. त्यांना आपण जास्त ढिले सोडून चालणार नाही आणि जास्त खेचून पण चालणार नाही. नक्की किती दबाव त्यांच्यावर टाकला पाहिजे हे आपणास बरोबर समजले पाहिजे. जर आपण त्यांच्यावर जास्त दबाव टाकला तर ते बंडखोर होतील आणि जर काहीच दबाव टाकला नाही, तर ते काहीच करणार नाही. उद्या ते आपणासच शिस्त लावली नाही म्हणून विचारतील. त्यासाठी आपल्याला एक सुवर्णमध्य साधता आला पाहिजे आणि ती एक तारेवरची कसरत आहे.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

समर्थनाची आवश्यकता

आपल्या किशोरवयात आपल्या भावना किती तीव्र होत्या आपल्या लक्षात आहे का? हार्मोन बदलाविषयी धूसर आठवणी, प्रत्येक गोष्ट अतिशयोक्तीपूर्ण वाटणे, कुटुंबातील सदस्यांबरोबर होणाऱ्या छोट्या छोट्या वादाचे मोठ्या वादात रूपांतर. रोजच्या जीवनातील प्रत्येक घटना आणि चर्चासुद्धा त्यांना नाट्यमय वाटू लागते. जेव्हा ते पालकांशी बोलायचा प्रयत्न करतात, तेव्हा माझ्यावर टीका होईल , माझे कुणी ऐकणार नाही किंवा माझ्या मताचे परीक्षण केले जाईल असे त्यांना वाटत राहते. जेव्हा ते स्वतःच त्यांचे प्रश्न सोडवायला जातात तेव्हा त्यांचे हार्मोन्स परिस्थिती आणखी कठीण करून ठेवतात. सामाजिक माध्यमे सुद्धा त्यांना दिशाभूल करू शकतात. दृकश्राव्य माध्यमातील जीवन आपल्यापेक्षा चांगले असल्याची खात्री करून देतात. हा एक परीक्षा काळ असतो आणि अशा वेळी फक्त मित्रांची सोबत हाच एक आधार असतो. मग ते जीवनातील प्रत्येक नवीन माहित नसलेल्या गोष्टी, नवीन अनुभव आणि प्रौढत्वाचे अज्ञात जग ह्यासाठी मित्रांवर अवलंबून राहू लागतात.

पालक काय करू शकतात 

किशोरवयीन मुलांना ते जे काही बोलतात त्यावर टिका नको असते , त्यामुळे ते कुटुंबातील व्यक्तीपेक्षा मित्रांबरोबर बोलण्याला जास्त प्राधान्य देतात.

संस्कृत मध्ये एक जुनी म्हण आहे, जेंव्हा आपली मुलगी किंवा मुलगा सोळा वर्षांचे होतात, तेंव्हा आपण त्यांच्याबरोबर मित्रासारखे वागा. त्यांचे शिक्षक बनू नका. त्यांनी काय करावं, काय करू नये हे त्यांना सारखं सांगू नका; उलट त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घ्या. एक मित्र, जो त्यांच्यासोबत असतो. एक मित्र, जो आपल्याला समजून घेतो, आपल्या भावनांना समजतो, आपल्या कठीण काळात सोबत असतो आणि अडचणी समजून घेतो. आपण असे त्यांचे मित्र बना. पालकासारखे न वागता मित्रासारखे वागा मग ते आपल्याशी मोकळेपणाने वागतील.

– गुरुदेव श्री श्री रवि शंकर

त्यांच्या जगाचा एक भाग बना. त्यांची भाषा शिका. त्यांच्या आकांक्षा किंवा इच्छा, नवनवीन फॅशन ,त्यांच्या लहरी, नवीन आलेले ॲप यांची माहिती करून घ्या. आपणास त्रासदायक वाटले तरीही कधीतरी त्यांना आवडणारे संगीत ऐका, नवीन हिट गाणी ऐका. त्यासंदर्भात आपले त्यांच्याबरोबर संभाषण वाढवा. मग बघा आपला मुलगा/मुलगी किती आश्चर्यचकित होतो त्याची आपणास कल्पना देखील नाही. पण त्यासाठी आपणास काही प्रयत्न मात्र जरूर करावे लागतील. आणि मग आपला पाल्य कोणत्या जगात राहतो ते आपणास समजणे सोपे होईल. तुमच्यामध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्यासाठी तो एक पूल तयार होईल.

मित्रांकडून दबाव आणि नवीन काही करण्याचा प्रयत्न

किशोरवयीन म्हणजे तुम्ही आपली एक स्वतंत्र ओळख बनवायला सुरवात करतात. स्वतःची एक शैली निर्माण करतात. स्व जोपासण्याची भावना तयार होते. आपण कोण आहोत याचे समर्थन करू लागता मग पालक सहमत असो वा नसो. इतके दिवस गोड असलेल्या आपल्या मुलाला आता नक्की काय झालय याचे आपणास कदाचित आश्चर्य वाटू लागेल. पण हा एक लहानपणा कडून प्रौढत्वाकडे जाण्याचा काळ आहे.

मित्रांच्या दबावात फीट बसण्यासाठी एक वेगळीच किंमत मोजावी लागते. त्यांच्या दबावामध्ये ते नवीन अनुभव करू लागतात , नवीन कल्पना अमलात आणतात. निषिद्ध गोष्टी पण करू लागतात. आणि कधीकधी कारणाशिवाय बंडखोरी पण करू लागतात. त्यांचे मित्र कधी कधी स्विकारार्ह नसतात , त्यांची शैली योग्य वाटत नसते. त्यांची कृती प्रश्नार्थक असते. ते एका वेदनामय भावनिक आणि शारीरिक वाढीच्या काळातून आणि परिस्थितीतून जात असतात. त्यांचे यौवनात पदार्पण करणारे शरीर कसे दिसेल, त्याला काही काळ आणि संयम पण ठेवावा लागेल.

पण हा प्रयोगाचा काळ खूप छोटा असतो ही आनंदाची गोष्ट आहे. एकदा त्यांना समजले की त्यांच्यासाठी काय योग्य शैली आहे मग ते फॅशनचे नवे प्रयोग करणार नाहीत . एकदा त्यांना त्यांचा योग्य मार्ग सापडला की ते त्याला धरून राहतील.

पालक काय करू शकतात

आपल्या पाल्याच्या मित्रांचे मित्र बना. आपला मुलगा आपले म्हणणे ऐकणार नाही पण त्याच्या मित्रातर्फे तुम्ही त्याला ते समजावू शकता. आपले घर त्याच्या मित्रांसाठी खुले ठेवा. त्यांचे चांगले काका/ मावशी बना. अशा प्रकारे आपले पालकांचे एक नेटवर्क तयार होईल.आणि आपल्या मुलांना योग्य काय आहे हे एकमेकांच्या मुलांना योग्य मार्गदर्शन करू शकता.

जसजसे त्यांना त्यांची स्वतःची ओळख पटू लागेल तसतसे आई, वडील आणि मुलांमध्ये काही भावना निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. कधीकधी आपणास मुलांवर आलेला राग फक्त गिळून घ्यावा लागेल, कधीकधी आपणास आवडत नसले तरी त्यांना काही बंधने घालावी लागतील की त्यांनी त्यांचे उल्लंघन करू नये आणि कधीतरी तुम्ही नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचाल आणि आपल्यातील जवळीक वाढत जाईल. वाढत्या किशोरवयीन मुलाबरोबर चांगले संबंध असणे असे नेहमीच सोपे होईल असे नाही, पण किशोरवयीन आणि लहानपणातील पाया बांधणी नीट झाली तर आपला मार्ग नक्कीच सुलभ असेल.

लहान आणि किशोरवयातील मुलांच्या शिबिरासाठी पहा.

हया लेखाच्या लेखिका श्रीमती विनिता नंदूरी , एक शिक्षणतज्ज्ञ, सुदर्शन क्रिया™ प्रशिक्षक आणि आर्ट ऑफ लिव्हिंग च्या “टिन अँड चिल्ड्रन्स” विभागाच्या सहयोगी संचालक आहेत.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *