आढावा
स्थळ : बंगलूरू
कालावधी : २०१२ ते आतापर्यंत
सरिता मॅडम येण्याअगोदर आम्ही वर्गामध्ये रोज भांडत असू व वादावादी करत असू. त्यांनी आम्हाला शांत कसे राहायचे ते शिकवले आणि ध्यानाने लक्ष केंद्रित कसे करता येते ते शिकवले. आम्ही एकमेकांबरोबर चांगले कसे वागावे हे देखील त्यांनी शिकवले. आता वर्गात पूर्वीप्रमाणे भांडणे होत नाहीत. आम्ही नेहमी हसत राहतो आणि वर्गामध्ये मजा करतो.
यशोदा, वय १२ वर्षे, विद्यार्थिनी, श्रीरामपूरा मुलींची उच्च माध्यमिक सरकारी शाळा.
भारतामध्ये प्रत्येक तीन विद्यार्थ्या मागे एक विद्यार्थी प्राथमिक शाळेची सुरवात करतो आणि मध्येच सोडून देतो. बरेच जण ते जे काही शिकले आहेत त्याचे योग्य प्रकारे सादरीकरण करू शकत नाहीत. ढोबळ मानाने सरकारी शाळातील चौथी ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपैकी ३०-४०% विद्यार्थ्यांना प्राथमिक लिहिणे किंवा वाचणे सुद्धा नीट जमत नाही. त्यांना शिकवणारा किंवा मार्गदर्शन करणारा देखील कोणी नसतो. त्यामुळे बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या घरातील ही लहान मुले शाळेत जाणे टाळतात आणि मग गुन्हेगारी, ड्रग, बालकामगार या विळख्यात सापडतात.
आम्ही अशा मुलांना शिक्षण योग्य प्रकारे घेता यावे या हेतूने विद्या शिल्प हा उपक्रम सुरू केला. यामध्ये आम्ही विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षण अधिकारी या सर्वांना एकत्र आणतो.बंगलोर मधील झोपडपट्टीतील ७००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आमच्या या उपक्रमामुळे फायदा झाला आहे. ज्या शाळांमध्ये आम्ही काम सुरू केले तेथील पटसंख्या वाढली आहे. बरेच विद्यार्थी जे शाळा सोडून गेले होते ते परत शाळेत यायला लागले. ज्या विद्यार्थ्यांना कन्नड वाचता किंवा लिहिता न येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. साक्षरतेचे प्रमाण वाढले.
आम्ही काय बदल घडवून आणला
- आम्ही झोपडपट्टीतील ३० शाळांना दत्तक घेतले. या शाळांमध्ये ७००० च्या आसपास विद्यार्थी शिकत आहेत.
- जवळ जवळ १५०० विद्यार्थ्यांना कन्नड लिहायला वाचायला येत नव्हते. उत्थान या विशेष वर्गाच्या साहाय्याने ते साक्षर झाले.
- विद्यार्थ्यांची सरासरी पटसंख्या १० % नी वाढली.
- २५० पेक्षा जास्त मुलांनी शाळा सोडली होती ते परत शाळेत येऊ लागले.
- पालकांचा मुलांच्या शिक्षणातील सहभाग १०-३०% ने वाढला.
- या उपक्रमामध्ये घेतल्या जाणाऱ्या वैद्यकीय आणि पर्यावरण जागृती च्या शिबिरामध्ये २५०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
- विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेमध्ये वाढ झाली , तसेच एकमेकांमधील संबंधामध्ये सुधारणा झाली.
- शिक्षकांच्या कार्यक्षमतेमध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आणि परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा झालेली दिसून आली.
स्वयंसेवकांच्या वचनबद्ध समूह या आमच्या शैक्षणिक उपक्रमाचे सारथ्य करीत आहे. आणि त्यांना सुदर्शन क्रियेने उत्साह व प्रेरणा मिळते. आपल्या घरबसल्या सहजपणे हि प्रभावी प्रक्रिया शिकून घ्या.
रजिस्टर करा.
आम्ही कसे काम करतो
या उपक्रमाचा भाग म्हणून आम्ही पुढील उपक्रम राबवतो:
- विद्यार्थ्यांसाठी उत्कर्ष योग आणि मेधा योग प्रोग्राम – ह्या कार्यशाळेमध्ये मुलांची बौद्धिक आणि भावनिक क्षमता वाढते. आणि त्यामुळे ते त्यांच्या पूर्ण क्षमतेचा लाभ घेऊ शकतात.
- L I V E लेसन इन व्हॅल्यू एज्युकेशन – शिक्षक व पदाधिकाऱ्यांसाठी मूल्य शिक्षणावर आधारित धडे – मूल्य शिक्षणाविषयी स्वजाणीव निर्माण होण्यासाठी आणि हे मूल्य शिक्षण मुलांना कसे शिकवता येईल यासाठी परिणामकारी कार्यशाळा.
- पालकांसाठी K Y C program तुमच्या पाल्याला जाणून घ्या. – मुलांच्या गरजा, स्वतःची आणि मुलांविषयी जबाबदारी चांगल्या प्रकारे ओळखता यावी याकरिता कार्यशाळा.
- मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी नियमित स्कूल डेव्हलपमेंट मॅनेजिंग कमिटी (SDMC) बरोबर शिक्षक व पालकांच्या भेटी.
आम्ही काय शिकलो
भारतामध्ये बऱ्याच विभागामध्ये पुरेशा शैक्षणिक सुविधा आहेत. त्याचा जास्तीत जास्त फायदा होण्याकरिता पालक आणि शिक्षण पदाधिकऱ्यांनी मुलांच्या शिक्षणामध्ये सहभाग वाढविला पाहिजे. त्यासाठी आग्रह धरणे आवश्यक आहे.
आपण कसे योगदान देऊ शकता
शाळेमध्ये मुलांच्या योग्य प्रगतीसाठी किती मार्गदर्शन मिळते आणि त्यांना किती मदत मिळते ही तशी गंभीर गोष्ट आहे. आपल्या मदतीने आम्ही हा प्रकल्प जास्तीत जास्त शाळा आणि मुलांपर्यंत पोहोचवू शकतो.
आमच्या सोबत सहभागी व्हा.