‘कोलेस्टेरॉल’ हा शब्द ऐकल्यावर मनात काय येते? हृदयविकाराचा झटका? मधुमेह? लकवा? तसे असल्यास, आपले अजिबात चुकलेले नाही. हे सर्व ‘उच्च कोलेस्टेरॉल’ असण्याचे संभाव्य धोके आहेत. उच्च कोलेस्टेरॉल किंवा हायपर कोलेस्टेरोलेमिया म्हणजे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी उच्च असणे. मग आपण नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कसे कमी करू शकतो? बहुतेक रुग्णांमध्ये उच्च कोलेस्टेरॉल एक धोक्याच्या सूचनेचा इशारा आहे. पण प्रथम कोलेस्टेरॉल म्हणजे काय ते पाहू.

कोलेस्टेरॉल हा तेलयुक्त चरबी असणारा पदार्थ आहे जो विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक आहे. तरीही, जेंव्हा पातळी खूप वाढते, तेंव्हा रक्तवाहिन्यांमध्ये त्याचे थर तयार होऊ शकतात., ज्यामुळे हृदयरोग, लकवा आणि आरोग्याच्या इतर समस्यांचा धोका वाढतो. पचनास मदत करण्यासाठी आणि हार्मोन्स आणि जीवनसत्व डी तयार करण्यासाठी आपल्याला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. कोलेस्टेरॉल पेशींच्या भिंतींच्या संरचनेत देखील योगदान देते. आपल्या रक्तातून लिपोप्रोटीन नावाच्या अगदी सूक्ष्म अशा वाहकातून कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात वहाते. कमी घनता असलेले लिपोप्रोटीन कोलेस्टेरॉल (LDL) हे घातक कोलेस्टेरॉल असते. त्याउलट उच्च घनता असलेले लिपोप्रोटीन (HDL) कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल असते.

कोलेस्टेरॉल कशामुळे वाढते ?

कोलेस्टेरॉलची पातळी अनेक कारणांमुळे वाढते. काही नियंत्रित केले जाऊ शकतात; काही केले जाऊ शकत नाहीत. चला यापैकी काही घटकांकडे पाहू या आणि ठरवू या की आपल्याकडे त्याच्याशी लढण्याची शक्ती आहे कां आणि जर होय, तर उच्च कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करावे ते पाहूया.

  1. अयोग्य आहार

सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्सची उच्च मात्रा असणारा आहार घेतल्याने एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि हे उच्च कोलेस्टेरॉलचे प्रमुख कारण आहे.

  • दूध आणि चीज यांसारखे कोलेस्टेरॉल असलेले पदार्थ मर्यादित प्रमाणात खावे.
  • ट्रान्स फॅट्स एलडीएल (LDL) वाढवते. उदाहरणार्थ, दुग्धजन्य पदार्थ, भाजलेले, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ.
  • ट्रान्स फॅट एलडीएल वाढवते आणि एचडीएल कमी करते. उदाहरणार्थ, तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ.
  • शाकाहारी आहाराच्या तुलनेत मांसाहारी आहारामध्ये उच्च कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात .
  1. व्यायामाचा अभाव / लठ्ठपणा

एचडीएल कोलेस्टेरॉल हे ‘चांगले’ कोलेस्टेरॉल आहे जे रक्तप्रवाहातून एलडीएल कोलेस्टेरॉल काढून टाकण्यास मदत करते. हे एचडीएल कोलेस्टेरॉल शारीरिक निष्क्रियतेमुळे कमी होऊ शकते. नियमित व्यायाम आणि योगासने एचडीएल पातळी वाढवण्यास आणि एलडीएल पातळी कमी करण्यास मदत करू शकतात. शारीरिक निष्क्रियतेमुळे वजन अधिक प्रमाणात वाढते आणि एकूण कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते.

  • आपल्या दैनंदिन दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा
  • आपल्या दिवसाची सुरुवात शरीराच्या विवीध अवयवांना ताणण्याने करा.
  • बैठी जीवनशैली टाळा – दर १ तासाने थोडेसे चाला.
  1. अनुवांशिक घटक

‘फॅमिलीअल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ हे अनुवांशिक आहे. यामध्ये उच्च कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. या स्थितीतील लोकांना एक किंवा दोन्ही पालकांकडून एक जनुक वारशाने मिळतो , ज्यामुळे त्यांचे यकृत खूप जास्त एलडीएल कोलेस्टेरॉल तयार करते.

  1. वय आणि लिंग

वयानुसार कोलेस्टेरॉलची पातळी वाढते आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त कोलेस्टेरॉल होण्याची शक्यता असते. पौगंडावस्थेपासून पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा कमी प्रमाणात एचडीएल असते. जसजसे स्त्री व पुरुषांचे वय वाढत जाते तसतसे एलडीएलसुद्धा वाढते. वय वर्षे ५५ पूर्वी स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी एलडीएल असते. तथापि, वयाच्या ५५ नंतर, स्त्रियांमध्ये LDL चे प्रमाण जास्त असते.

धूम्रपान किंवा उच्च रक्तदाब आणि त्या सोबत धोकादायक कोलेस्टेरॉलची पातळी यामुळे हृदयविकाराचा धोका लवकर वाढू शकतो. आणि हेच एक कारण आहे नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कसे नियंत्रित करावे हे शिकण्याचे.

यापैकी बऱ्याच गोष्टी करण्यायोग्य आहेत. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा की लोक त्यांच्या जीवनशैलीत बदल करून कोलेस्टेरॉलची पातळी कमी आणि त्यांच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. आहारातील बदल करणे, नियमित व्यायाम करणे, धूम्रपान सोडणे आणि आरोग्याच्या समस्यांचे व्यवस्थापन करणे या सर्व गोष्टी कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. काही प्रकारांमध्ये उच्च कोलेस्टेरॉलचे व्यवस्थापन करण्यासाठी औषधे देखील आवश्यक असू शकतात.

नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कसे कमी करावे

कोलेस्टेरॉल कमी करण्याचे नैसर्गिक उपाय एकूण आरोग्य सुधारण्यास आणि हृदयविकार, लकवा इ. यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका कमी करण्यात मदत करू शकतात. हे स्नायू दुखणे, यकृताचे नुकसान आणि कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या औषधांचे संभाव्य दुष्परिणाम आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यास देखील मदत करू शकते.

१. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी साठी योग

योगासने विविध संबंधित समस्यांचे निराकरण करून कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. नियमित योगासने, प्राणायाम, ध्यान आणि योग्य आहार यामुळे एचडीएल वाढू शकतो आणि एलडीएल कमी होतो.

तुमचे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करणारी योगासने:

  • तणाव निर्माण करणारी हार्मोन्स कमी करतात.
  • अंतःस्रावी प्रणालीला उत्तेजित करून वजन कमी करण्यास सक्षम बनवतात.
  • बैठ्या जीवनशैलीशी लढण्यास सक्षम करून जोम वाढवितात
  • विविध आसनांमध्ये शरीर ताणले जाते. त्यामुळे ओटीपोटातील इंद्रियांना मालिश होते. जेणेकरून त्यांचे कार्य सुधारते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी होते.
  • शरीरातील विषारी द्रव्ये आणि अनावश्यक कचरा यांचा प्रभावीपणे निचरा होतो.

चक्रासन (चाकाप्रमाणे आसन)

चक्रासनाचे फायदे

  • पोटातील इंद्रियांना मालिश होते आणि पचनास मदत करते.
  • बद्धकोष्ठता दूर करते.
  • यकृताचे कार्य सुधारते, अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यास मदत करते.
  • रक्त प्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारते, हृदयरोगाचा धोका कमी करते .
shalabhasana
shalabhasana

शलभासन (टोळाप्रमाणे आसन)

  • पोट, नितंब, कंबर आणि मांड्यांमध्ये चरबी कमी करते.
  • पोटातील इंद्रियांना उत्तेजित करते, जेणेकरून पचनक्रिया सुधारते.
  • बद्धकोष्ठतेवर मात करण्यास मदत करते. आतड्याची नियमित हालचाल कोलेस्टेरॉल पातळी कमी करू शकते

शलभासनाबद्दल अधिक वाचा.

Sarvangasana - inline

सर्वांगासन

  • पोटातील इंद्रियांना उत्तेजित करते.
  • पचन सुधारते.
  • अंतःस्रावी प्रणालीला चालना देते.
  • हृदयाच्या स्नायूंना ताण मिळतो. त्यामुळे नसांमधील अधिकाधिक रक्त हृदयाकडे परतते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते.

सर्वांगासनाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Paschimottanasana

पश्चिमोत्तानासन (बसलेल्या स्थितीत पुढे झुकणे)

पश्चिमोत्तनासनाचे फायदे..

  • यकृत आणि मूत्रपिंड उत्तेजित करते.
  • लठ्ठपणा कमी होण्यात मदत होते.
  • पोटातील अतिरिक्त चरबी कमी होते.
  • तणाव आणि चिंता कमी करण्यात मदत होते.
Ardha matsyendrasana

अर्ध मत्स्येंद्रियासन (बसलेल्या स्थितीत पाठीचा कणा अर्धा वळवणे)
अर्ध मत्स्येंद्रासन कसे करावे यासाठी येथे क्लिक करा.

  • पोटातील अवयवांना मालिश करते.
  • यकृताला उत्तेजित करते.
  • अपचनावर मात करण्यास मदत होते.

या आसनांचा दररोज सराव करत रहा, आणि कालांतराने तुम्हाला [३२९२६८:योगाचे फायदे] फायदे दिसतील. मात्र, नैसर्गिकरीत्या कोलेस्टेरॉल कसे कमी करता येईल यासाठी योगासने हा एकमेव उपाय नाही; जागरुकतेने श्वास घेणे किंवा प्राणायाम हा देखील व्यायामाचा एक अपरिहार्य भाग आहे. श्वास आणि उच्छवास यांची शक्ती पाहून आपण आश्चर्यचकित व्हाल!

२. प्राणायाम नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कमी करण्यात कसे मदत करतात

kapalbhati pranayama inline

कपालभाती
कपालभातीचे फायदे

  • चयापचयाचा दर वाढवते. त्यामुळे चरबीचे ज्वलन वेगाने होण्यास मदत होते.
  • पोटाच्या अवयवांना उत्तेजित करते.
  • पचनसंस्थेचे कार्य सुधारते
  • रक्ताभिसरण सुधारते.

नाडी शोधन प्राणायाम

  • अवरोधित नाड्या किंवा ऊर्जा वाहिन्या साफ करते.
  • तणाव आणि टेन्शन यापासून सुटका मिळण्यास मदत करते.
  • चयापचय दर वाढवते. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात येते.
  • निरोगी जीवनशैली सक्षम करते.

नाडीशोधन प्राणायामाबद्दलअधिक जाणून घ्या

आपण आपली योगासने आणि नित्यक्रमांना ध्यानाने पूरक बनवू शकता. शरीराला आराम आणि मन शांत करण्यासाठी ध्यानाचे फायदे सर्वश्रुत आहेतच.

उच्च कोलेस्टेरॉलची पातळी कशी नियंत्रित करायची हे शिकताना योगासन करण्याव्यतिरिक्त, आपण काय खातो त्याबाबतीत जागरूक असले पाहिजे.

निरोगी कोलेस्टेरॉल पातळीकरिता आरोग्यदायी आहारच्या सूचना

आरोग्यदायी आहाराचा हेतू एचडीएल वाढवणे आणि एलडीएलची पातळी कमी करणे होय. कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असल्याचे समजल्यानंतर बरेच लोक निराश होतात. उदास होण्याची गरज नाही. नैसर्गिकरित्या कोलेस्टेरॉल कसे कमी करावे हे शिकत असताना आरोग्यदायी आहाराबाबत काही सूचना खालीलप्रमाणे:

  • अधिक तंतुमय पदार्थांचे सेवन करा
  • भरपूर फळे खा, विशेषतः क जीवनसत्व युक्त
  • भेंडी, वांगी, सलगम, आणि रताळे या सारख्या द्रवणीय तंतूंनी समृद्ध असलेल्या भाज्या
  • ओट्स आणि जव आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉल घट्ट करतात आणि त्यांचे शोषण रोखतात.
  • दररोज मूठभर न खारवलेला सुका मेवा खाल्ल्याने तुमचे कोलेस्टेरॉल सरासरी ५% ने कमी होऊ शकते.
  • कडधान्यांचा समावेश करा.
  • भरपूर पाणी प्या.
  • अति कॅफिन टाळा
  • दारू आणि तंबाखूला नाही म्हणा

तुमचा एचडीएल वाढवणे आणि तुमची एलडीएल पातळी कमी करणे या आहाराचा हेतू आहे.

योगाचा सराव करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे हे देखील आपणास सकारात्मक आणि उत्साही राहण्यास मदत करू शकते. शिवाय, त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. आपणास एकाच गोष्टीची खातरजमा करायची आहे की हे नियमित राहायचे आणि मनापासून सराव सुरु ठेवायचा, आणि शेवटी आपणास वजनकाट्यावर सकारात्मक बदल दिसून येणारच! हे शरीर आणि मनाचा विकास करण्यास देखील मदत करते. असे केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. तरी तो औषधाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा.

प्रशिक्षित योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योगासने शिकणे आणि त्यांचा सराव करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असल्यास, डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घेतल्यानंतरच योगासनांचा सराव करा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *