धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला ज्या अनेक वैद्यकीय परिस्थितींचा सामना करावा लागतो त्यापैकी लठ्ठपणा हा कदाचित सर्वात हानिकारक आहे. शरीरात जास्त चरबी जमणे आणि ती साठून रहाणे म्हणजेच अति स्थूलपणा किंवा लठ्ठपणा, ज्याच्या मुळे हृदयविकाराच्या झटक्यांसारखे धोके वाढतात.

लठ्ठपणा म्हणजे काय

डब्ल्यूएचओ (WHO) वेबसाइटवर उपलब्ध पत्रकानुसार, १९८० पासून जगभरात लठ्ठपणा जवळजवळ दुप्पट झाला आहे. २००८ मध्ये, ३०० दशलक्ष महिला आणि २०० दशलक्ष पुरुष लठ्ठ होते. ही आकडेवारी बघून तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी वाटते कां ? तुम्हाला घाम येण्याआधी हे समजून घ्या की तुम्ही लठ्ठही नसाल. तांत्रिकदृष्ट्या बोलायचे झाल्यास, लठ्ठ असणे हे जास्त वजनापेक्षा वेगळे आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) २५ किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला लठ्ठ म्हणतात. तथापि, 30 पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय लठ्ठ श्रेणीत येतो.

बाहेर पडण्याचा मार्ग काय आहे

आपण कोणत्‍याही श्रेणीत असलात तरी, दोन्ही स्थिति मध्ये काही गंभीर कृती करणे गरजेचे असते. लठ्ठपणावर पकड कशी मिळवायची याबद्दल आपणास खात्री नसल्यास, आपण योग्य ठिकाणी आहात. आपला लठ्ठपणा कमी करण्यावर काम करताना, आपल्याला हानी पोहोचवणाऱ्या गोष्टी टाळणे आणि आपल्या आरोग्यासाठी चांगल्या गोष्टी निवडणे आवश्याक आहे. सुरुवातीला, आपण नियमितपणे फक्त निरोगी आहार घेत आहोत आणि काही शारीरिक व्यायाम करत आहोत याची खात्री करा. व्यायामशाळेत जाणे ही वर्कआउटची आपली आदर्श कल्पना नसल्यास, योगा सारखे नैसर्गिक पर्याय निवडा.

नैसर्गिकरित्या आरोग्याची पुनर्बांधणी

योग हे एक प्राचीन तंत्र आहे , ज्याचे उद्दिष्ट नेहमीच उत्तम जीवनशैली, सुधारित खाण्याच्या सवयी आणि शारीरिक नियमांद्वारे सर्वांगीण जीवनाला चालना देणे हे असते. विविध आसनांद्वारे नियंत्रित श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणारे नैसर्गिक तंत्र असल्याने, योग हा पूर्णपणे सुरक्षित आणि वजन कमी करण्याच्या एलोपॅथिक गोळ्यांसाठी योग्य पर्याय आहे. आपला बीएमआय कमालीचा उच्च असला किंवा आपला फक्त तंदुरुस्त राहण्यावर विश्वास असला, तरी योग सर्वांची पूर्तता करतो. येथे काही योग तंत्रे आहेत ज्यांच्या सहाय्याने आपण आपले वजन कमी करण्याच्या मार्गाची सुरुवात करू शकता:

कपाल भाती प्राणायाम

Kapal Bhati - inline

या श्वसन तंत्रामुळे चयापचय गती वाढते आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पंचनसंस्थेचे कार्य, शोषण आणि पोषक तत्वांचे शोषण देखील सुधारते.

पश्चिमोत्तानासन

Paschimottanasana

हे आसन उदर आणि ओटीपोटाच्या अवयवांना मालिश करते आणि टोन करते. हे पचन सुधारण्यासाठी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

वीरभद्रासन

veer bhadrasana

या आसनामुळे शरीरातील संतुलन सुधारते आणि सहनशक्ती निर्माण करते. या आसनाचा सराव केल्याने पोटाचे अवयव देखील उत्तेजित होतात.

वीरभद्रासनाबद्दल अधिक जाणून घ्या.

दंडासन

हे आसन पोटासाठी चांगले आहे. हे शरीराच्या वरच्या भागासाठी चांगले आहे कारण ते मनगट आणि हात मजबूत करते.

पूर्वोत्तानासन

पूर्वोत्तानासनाचे फायदे.

या आसनामुळे आतडे आणि पोटाचे अवयव ताणले जातात. तसेच पोटाला टोनिंग होण्यास मदत होते.

नौकासन

Naukasana

हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते, पचन सुधारते आणि आतडे उत्तेजित करते.

शलभासन

shalabhasana

हे आसन मसाज करते आणि पोटाच्या अवयवांना टोन करते. तसेच शरीरातील पचन आणि लवचिकता सुधारते.

हलासन

halasana - inline

हलासनाचे फायदे.

हे आसन पोटाच्या स्नायूंना मजबूत आणि उत्तेजित करते. त्यामुळे तणाव आणि थकवाही दूर होतो.

बदलती जीवनशैली

एक चांगली जीवनशैली अंगिकारली तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नाचा परिणाम लक्षणीयरित्या सुधारता येईल. योगाभ्यास करण्याव्यतिरिक्त, आयुर्वेदिक जीवनशैलीचे पालन करून आपल्या वजन कमी करण्याच्या प्रयत्नांना गती मिळू शकते. आयुर्वेदाला अनेकदा योगाची बहीण म्हणून संबोधले जाते, असा आयुर्वेद हा योगाच्या काळापासूनच आहे. आयुर्वेद ही नैसर्गिक आणि सर्वांगीण औषधांची एक प्राचीन प्रणाली आहे आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्यासाठी त्याची मदत होते. स्वयंपाक करताना आयुर्वेदिक पाककला पद्धती वापरल्या तर वजन कमी करताना रुचकर पदार्थही बनवता येतील

आपल्या मर्यादांचा आदर करा.

योगाची सुरुवातीला भीती वाटते, पण जबरदस्त लठ्ठपणा घालविणे साठी सहज-सोपा पर्यायी मार्ग आहे. सुरुवातीला काही आसनांमध्ये वाकणे अवघड जाते, पण दररोजच्या सरावामुळे आपणास आणखी ताणण्यास मदत करते. हे पण महत्वाचे आहे की आपल्या शरीराच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत, आणि आपण झटपट वजन कमी करण्यासाठी मर्यादेबाहेर ताण देणे मूर्खपणाचे होईल. तुमचे शरीर परवानगी देईल तोपर्यंत ताणून घ्या आणि जाणीवपूर्वक श्वास घेत असताना त्या स्थितीत आराम करा.

आपले वजन कमी करा, मन नाही

योगामुळे वजन लवकर कमी होत नाही. परंतू त्यांचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात. सुरुवातीला, आपणास असे वाटेल की वजन कमी होण्यात काहीच प्रगती होत नाहिये, परंतु आपल्या आतमध्ये अधिक सक्रिय आणि जिवंत वाटू लागेल. अखेरीस, शरीर प्रतिसाद देण्यास सुरुवात करेल आणि चांगल्या स्थितीत परत येईल. नेहमी लक्षात ठेवा की संयम हे सार आहे. आशा गमावू नका आणि आपल्या सरावात नियमित राखा. तुमच्या योग प्रशिक्षकाशी बोला आणि आपले वजन कमी करण्यात मदत करणारी एक अनुकूल पद्धती तयार करा.

निरोगी शरीर हे शांत आणि ग्रहणशील मनाचे घर असू शकते. हे आपणास चांगले दिसण्यासोबतच आपला आत्मविश्वास देखील वाढवते. हे आपल्या आरोग्याला असणारे धोके कमी करते त्यामुळे आपण जीवनाचा आनंद अधिक मुक्तपणे घेऊ शकतो. आपल्या शरीराला त्रासदायक असलेल्या गोष्टी कमी करून या सर्व गोष्टी मिळवण्यास योगाची मदत होते. यामुळे आपण वजन कमी करतो आणि आपल्या शरीरावर नियंत्रण देखील मिळवतो. म्हणून, आजच आपली योगा मॅट घ्या आणि लठ्ठपणाशी लढण्यासाठीचा नैसर्गिक मार्ग स्वीकारा.

योगाभ्यास शरीराचा आणि मनाचा विकास करण्यास मदत करते आणि आरोग्यासाठी बरेच फायदेही होतात, तरीही तो औषधाला पर्याय नाही. प्रशिक्षित श्री श्री योग प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली योगासने शिकणे आणि सराव करणे महत्वाचे आहे. कोणत्याही वैद्यकीय स्थितीच्या बाबतीत, डॉक्टर आणि श्री श्री योग प्रशिक्षकांचा सल्ला घेतल्यानंतरच योगासनांचा सराव करा. आपल्या जवळच्या आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटरमध्ये श्री श्री योग कार्यक्रम शोधा. आपणास कार्यक्रमांबद्दल माहिती हवी असेल तसेच अभिप्राय द्यायचा असल्यास आम्हाला info@srisriyoga.in वर लिहा.

    Hold On!

    Don't leave without a smile

    Talk to our experts and learn more about Sudarshan Kriya

    Reverse lifestyle diseases | Reduce stress & anxiety | Raise the ‘prana’ (subtle life force) level to be happy | Boost immunity

    *
    *
    *
    *